For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लघूबचत योजनांवर व्याजदर जैसे थे

06:10 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
लघूबचत योजनांवर व्याजदर जैसे थे
Advertisement

सुकन्या समृद्धी योजनेत 8.2 टक्के व्याजदर : पीपीएफवर 7.1 टक्के

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

केंद्र सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी लघूबचत योजना म्हणजेच पीपीएफ, पोस्ट ऑफिस मुदतठेवी, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरांमध्ये कुठलाच बदल केलेला नाही. सलग 11 व्या तिमाहीत व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहे. सरकारने यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये व्याजदरांमध्ये अखेरची वाढ केली होती.

Advertisement

पब्लिक प्रोविडेंट फंडवर (पीपीएफ) 7.1 टक्के आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2 टक्के व्याज मिळत राहणार आहे. लघूबचत योजनांवरील व्याजदर 4 टक्के ते 8.2 टक्क्यांदरम्यान आहेत. सरकार लघूबचत योजनांच्या व्याजदरांवर निर्णय घेण्यापूर्वी देशातील रोकड आणि महागाईच्या स्थितीवरही नजर ठेवते. या व्याजदरांची समीक्षा दर तीन महिन्यांनी केली जात असते.

लघूबचत योजनांचा व्याजदर निश्चित करण्याचा फॉर्म्युला श्यामला  गोपीनाथ समितीने सुचविला होता. लघूबचत योजना भारतात अनेक परिवारांच्या बचतीचा मुख्य स्रोत आहेत. या योजनांमध्ये ठेवीदारांना त्यांच्या रकमेवर निश्चित व्याज मिळते. सर्व लघूबचत योजनांमधून जमा रक्कम राष्ट्रीय लघूबचत निधीमध्ये जमा केली जाते.

योजना                                                          सध्याचा व्याजदर

सुकन्या समृद्धी योजना                                 8.2 टक्के

ज्येष्ठ नागरिक बचत योजना                              8.2 टक्के

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र                              7.7 टक्के

पोस्ट ऑफिस मुदतठेव (5 वर्षे)                    7.5 टक्के

किसान विकास पत्र                               7.5 टक्के

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना         7.4 टक्के

पब्लिक प्रोविडेंट फंड (पीपीएफ)           7.1 टक्के

पोस्ट ऑफिस मुदतठेव (3 वर्षे)             7.1 टक्के

पोस्ट ऑफिस मुदतठेव (2 वर्षे)             7.0 टक्के

पोस्ट ऑफिस मुदतठेव (1 वर्षे)             6.9 टक्के

पोस्ट ऑफिस बचत खाते              4.0 टक्के

Advertisement
Tags :

.