‘युएस फेडरल’कडून व्याजदरात कपात
सलग दुसऱ्यांदा घेतलेल्या निर्णयाने दिलासा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉईंट्सनी (0.25 टक्क्याने) कपात केली आहे. आता व्याजदर 4.50 टक्के ते 4.75 टक्क्यांदरम्यान असतील. यापूर्वी 18 सप्टेंबर रोजी फेडरल बँकेने व्याजदरात 50 बेसिस पॉईंट म्हणजेच अर्ध्या टक्क्याने कपात केली होती. अमेरिकन फेडरल बँकेने मार्च 2020 नंतर प्रथमच सप्टेंबर 2024 मध्ये व्याजदरात कपात केली होती. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ अमेरिकाने मार्च 2022 ते जुलै 2023 दरम्यान 11 वेळा व्याजदर वाढवले होते.
गेल्यावषी फेडरल रिझर्व्हने आपल्या धोरणात्मक निर्णयात सलग तिसऱ्यांदा व्याजदर अपरिवर्तित ठेवले होते. तथापि, फेडरलने असेही सूचित केले होते की 2024 मध्ये दरकपात दिसून येईल आणि ते 4.6 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते. महागाईचा सामना करण्यासाठी फेडरलने मार्च 2022 पासून दर वाढवण्यास सुऊवात केली. गेल्यावषी जुलैपर्यंत हे दर 23 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर गेले होते.