निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेला प्रारंभ
मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन, 300 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
आबा हिंद स्पोर्ट्स क्लब व क्रीडा भारती आयोजित दुसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेचे उद्घाटन थाटात झाले. अॅड. रविराज पाटील, बसवेश्वर बँकेचे व्हा. चेअरमन सतीश पाटील, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलबते, चेअरमन अॅड. मोहन सप्रे, कर्नाटक राज्य क्रीडा भारतीचे सेक्रेटरी अशोक शिंत्रे, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
या वेळेला कार्पोरेशन जलतरण तलावाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्या निमित्त जलतरणप्रेमी व बेकर्स अमरनाथ मेलगे यांनी जलतरणाची केकद्वारे प्रतिकृती तयार करुन जलतरणपटूच्या हस्ते कापून तलावाचा सुवर्ण वर्ष साजरा केला. यावेळी क्लबचे पदाधिकारी राजू गडकरी, सुनील हनमनावर, अमित जाधव, रणजीत पाटील, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, विजया शिरसाठ, परशराम मंगनाईक, सुनील जाधव, वैभव खानोलकर, हरीश मुचंडी, अॅड. सुधीर धामणेकर, सतीश धनुचे व इतर मान्यवर उपस्थित होत.s
यावेळी मान्यवरांनी जलतरणपटूंच्या पालकांचं जलतरणपटूंचे अभिनंदन करताना त्यांनी उत्तम कामगिरी करण्याबद्दल तसेच बेळगावातील जलतरणपटू, तसेच खो-खो, कब•ाr, बॉक्सिंग, क्रिकेट, बॉडी बिल्डिंग, जुडो, अॅथलेटिक्स, टेबल टेनिस बॅडमिंटन हॉकी अशा खेळांमध्ये बेळगाव प्रगती करत आहे. त्यांची प्रगती आंतरराष्ट्रीय ते ऑलिम्पिकपर्यंत वाढ होण्यासाठी त्यांना अध्यावत असं क्रीडा संकुल निर्माण करण्याची त्यांनी जी योजना बनवली आहे ती येत्या काही काळामध्ये पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहून तसेच बेळगाव मधील हा जो 25 मी. जलतरण तलाव आहे, त्याचे देखील नूतनीकरण करण्याचे काम आपण लवकर हाती घेऊ सांगितले.
येथे सुरू असलेल्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेसाठी गोवा महाराष्ट्र व कर्नाटक मधून 300 पेक्षा जास्त जलतरणपटूनी भाग घेतला असून दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार दि. 2 रोजी संध्याकाळी सहा वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केला जाणार असल्याची माहिती जलतरण स्पर्धा प्रमुख विश्वास पवार यांनी दिली.