For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकन चषक फुटबॉल स्पर्धेतून इंटरमियामीची माघार

06:44 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकन चषक फुटबॉल स्पर्धेतून इंटरमियामीची माघार
Advertisement

वृत्तसंस्था/ शिकागो

Advertisement

चालू वर्षी होणाऱ्या अमेरिकन चषक खुल्या फुटबॉल स्पर्धेतून अर्जेंटिनाचा कर्णधार लायोनेल मेस्सी आणि इंटर मियामी फुटबॉल क्लबने माघार घेतली आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केवळ 8 प्रमुख फुटबॉल संघांनी आपला सहभाग जाहिर केला आहे.

सदर स्पर्धेमध्ये एकूण 96 फुटबॉल संघांचा समावेश होईल. पण सध्या अॅटलांटा, डल्लास, होस्टन, कॅनास सिटी, लॉस एंजिल्स, सॉल्ट लेक, सॅन जोस आणि सिटेली या फुटबॉल क्लबनी आपल्या प्रवेश पत्रिका आयोजकांकडे पाठविल्या आहेत. होस्टन हा संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात होस्टनने इंटर मियामीचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव करुन जेतेपद पटकाविले होते. या अंतिम सामन्यात दुखापतीमुळे मेस्सी इंटर मियामी संघाकडून खेळू शकला नव्हता.

Advertisement

Advertisement
Tags :

.