महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शनिवारपासून आंतरविभागीय शिक्षक बदली प्रक्रिया

06:01 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

शैक्षणिक जिल्हा, विभाग स्तरावरील शिक्षक भरती प्रक्रियेनंतर आता आंतरविभागीय बदली प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. 17 ते 27 ऑगस्ट दरम्यान टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक जिल्हा व विभागीय स्तरावर संधी न मिळालेल्या शिक्षकांना राज्यस्तरावरील बदली प्रक्रियेमध्ये संधी मिळणार आहे.

Advertisement

मागील महिन्यापासून शिक्षक बदलीसाठीचे कौन्सिलिंग सुरू आहे. प्रारंभी शैक्षणिक जिल्हा स्तरावरील बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये संधी न मिळालेल्यांना आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर आता राज्यस्तरावरील बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षक, सहशिक्षक या पदांसाठी हे कौन्सिलिंग होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article