For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पारंपरिक-आधुनिक औषध पद्धतींवर एकत्रित संशोधन गरजेचे

10:10 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पारंपरिक आधुनिक औषध पद्धतींवर एकत्रित संशोधन गरजेचे
Advertisement

तज्ञांचे मत, आयसीएमआरमध्ये दोन दिवसीय परिषदेचे आयोजन : औषधांचे महत्त्व स्पष्ट

Advertisement

बेळगाव : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडीशनल मेडिसीन यांच्या संयुक्त विद्यमाने आयसीएमआरमध्ये दोन दिवसीय संसर्गजन्य रोगांसाठी एकात्मिक आरोग्य उपाय या विषयावर भागधारकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक आणि आधुनिक औषध पद्धतींवर एकत्र येऊन संशोधन करणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव आणि आयसीएमआरचे डीजी डॉ. राजीव बहल यांनी पुराव्यावर आधारित औषधांचे महत्त्व सांगितले. संसर्गजन्य रोगांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पुराव्यावर आधारित उपचार विकसित करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पारंपरिक औषधांचे ज्ञान वाढविले पाहिजे. समकालीन आणि पारंपरिक औषध पद्धतींवर शास्त्रज्ञ आणि चिकित्सकांनी हात मिळवणी करून यावर काम केले पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने याचा लाभ होणार आहे. संसर्गजन्य रोगांवर प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा मार्गदर्शन करताना म्हणाले, संसर्गजन्य रोगांवर प्रभावी औषध शोधण्यासाठी आयुष आणि इतर संशोधन संस्थांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. यावेळी पारंपरिक औषध पद्धतीचे ज्ञान महत्त्वाचे असून विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले. डेंग्यु, मलेरिया, रिव्हर इंन्फेक्शन, चिकुनगुनिया या आजारांवर प्रभावी औषध शोधण्यासाठी पारंपरिक आणि अत्याधुनिक औषध पद्धतींवर संशोधन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. ट्रॉन्स-डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी, बेंगळूरचे कुलगुरु पद्मश्री डॉ. अनंत दर्शन शंकर यांनी पारंपरिक आणि अत्याधुनिक औषध पद्धतींवर एकत्रितरित्या संशोधन करुन क्लिस्ट असणारे विषय सोप्या पद्धतीने समजून घेतले पाहिजेत. यावर सध्याच्या विज्ञानाच्या माध्यमातून संशोधन करुन पारंपरिक पद्धतींचा आरोग्य दृष्टीकोन अबाधित ठेवून संशोधनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

नामांकित तज्ञ सहभागी

देशभरातील विविध शाखा आणि प्रणालीमधील नामांकित तज्ञ, संशोधक या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्याकडून एकत्रित चर्चा करण्यात आली. आयसीएमआरचे प्रमुख डॉ. आर. लक्ष्मीनारायण यांनी आयसीएमआर आणि एनआयटीएम यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या परिषदेचे महत्त्व विशद करुन या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी आयसीएमआर आणि एनआयटीएम यांचे डायरेक्टर डॉ. सुबर्णा रॉय यांनी पारंपरिक आणि अत्याधुनिक औषध पद्धतीवर आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमुळे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले. शेवटी संयोजक डॉ. ज्योती भट्ट यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Advertisement
Tags :

.