येत्या सोमवार पर्यंत ३७ हजार शेतकऱ्यांना ६७ कोटीची विमा रक्कम जमा होणार
सिंधुदुर्गनगरी
क्रेडीट मिळवण्यासाठी विरोधकांकडून
आंदोलने ; प्रभाकर सावंत
फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही या बाबत विरोधकांनी केवळ पेपरबाजी करण्याचं काम केलेलं आहे. मात्र भाजपाच्या किसान मोर्चाने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यात शिल्लक राहीलेल्या १८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आता फळपिक विमा योजनेची रक्कम मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या सोमवार पर्यंत जिल्ह्यातील सर्व ३८ हजार शेतकऱ्यांना ६८ कोटी रुपयांची विमा रक्कम त्यांच्या बँक खाती जमा होणार आहे. अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील पत्रकार कक्षामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, किसान मोर्चाचे कोकण विभाग संघटक डॉ. भाई बाणकर, मालवण तालुकाध्यक्ष महेश सारंग उपस्थित होते.
यावेळी श्री. सावंत यांनी बोलताना सांगितले की, फळपिक विमा योजनेची रक्कम मिळण्यासाठी विरोधकांनी आंदोलने करुन क्रेडीट घेण्याचं काम केलं आहे. परंतू शेतकऱ्यांना फळपिक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी खऱ्याअर्थाने भाजपाच्या किसान मोर्चाने काम केलेले आहे. फळपिक विमा योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ हजार ३७३ आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी ७७ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावरील फळपिक विमा उतरवला होता. या फळपिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५८ महसूल मंडळातील ह्यामान केंद्राची नोंद घेणे अपेक्षीत होते. परंतू त्यातील ४० हवामान केंद्रांची नोंदन घेण्यात आली होती. १८ हवामान केंद्रे ही नवीन झाल्याने नोंद मिळू शकली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला ४० मंडळातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळायला सुरुवात झाली. परंतू १८ मंडळातील शेतवत्री विम्यापासून वंचीत राहीले होते. याचा अभ्यास भाजपा किसान मोर्चाने करुन शिल्लक राहीलेल्या १८ मंडळातील शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु केला.