महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विरोधी पक्षांकडून ‘हिंदू’ धर्माचा अपमान : मोदी

06:24 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमच्यासाठी श्रद्धेय ‘शक्ती’वर काँग्रेस-द्रमुककडून वार : तामिळनाडूत जाहीर सभा संबोधित

Advertisement

वृत्तसंस्था/ सेलम

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या दक्षिणेतील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. 19 मार्च म्हणजेच मंगळवारी पंतप्रधान मोदींनी केरळच्या पलक्कड येथे सकाळी रोड शोमध्ये भाग घेतला. त्यांनी मोदींनी तामिळनाडूच्या सेलम येथे जात तेथेही रोड शो केला आहे. तसेच जाहीर सभेला संबोधित केले आहे. या सभेत बोलताना मोदींनी इंडी आघाडीचे नेते वारंवार हिंदू धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप केला आहे. हिंदू धर्माच्या ज्या शक्तीवर श्रद्धा आहे, त्या शक्तीला नष्ट करण्याचा प्रयत्न द्रमुक आणि काँग्रेस करत असल्याचा दावाही मोदींनी केला आहे.

17 मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आमची लढाई शक्तीच्या विरोधात असल्याचे वक्तव्य केले होते. तर सोमवारी तेलंगणातील जगतियाल येथे बोलताना मोदींनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले होते. माझ्यासाठी प्रत्येक माताभगिनी शक्तीचे रुप आहे. मी त्यांच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावू शकतो असे म्हणत मोदींनी काँग्रेसची राजकीय कोंडी केली आहे. मोदींकडून लक्ष्य करण्यात आल्यावर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर स्वत:च्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

आता तर निवडणूक प्रचाराची सुरुवात झाली आहे. परंतु इंडी आघाडीचे प्लॅन मुंबईत झालेल्या त्यांच्या पहिल्या सभेतच उघडपणे समोर आले आहेत. हिंदू धर्माच्या ज्या शक्तीवर श्रद्धा आहे, त्या शक्तीचा विनाश करायचा असल्याचे विरोधी पक्षांचे नेते म्हणत आहेत. हिंदू धर्मात शक्ती कुणाला संबोधितात हे तामिळनाडूतील प्रत्येक जण जाणून आहे. शक्तीचा अर्थ मातृशक्ती, नारीशक्ती आहे. परंतु विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील काँग्रेस आणि द्रमुक या शक्तीला संपविणार असल्याचे म्हणत असल्याची टीका मोदींनी केली आहे.

हिंदू धर्माच्या अपमानाचा आरोप

द्रमुक आणि काँग्रेस वारंवार हिंदू धर्माचा अपमान करतात. हिंदू धर्माच्या विरोधातील त्यांचे प्रत्येक वक्तव्य अत्यंत विचारपूर्वक केलेले असते. हिंदू धर्म वगळता अन्य कुठल्याही धर्माचा काँग्रेस आणि द्रमुक अपमान करत नाहीत. तसेच अन्य कुठल्याही धर्माच्या विरोधात त्यांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही. परंतु हिंदू धर्माच्या विरोधात बोलण्यात ते नेहमीच पुढे असतात असे मोदींनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख

रालोआ सरकार देशात 2 डिफेन्स कॉरिडॉर निर्माण करत आहेत. यातील एक कॉरिडॉर तामिळनाडूत निर्माण होत आहे. भाजप सरकार 7 मेगा टेक्सटाइल पार्क स्थापन करणार असून यातील एक तामिळनाडूत निर्माण केले जाणार आहेत. तामिळनाडूसाठी आम्ही अनेक योजना राबविल्या आहेत. येथे वंदे भारत एक्स्प्रेस देखील चालविली जात असल्याचा उल्लेख मोदींनी केला आहे.

तमिळ जगाची सर्वात जुनी भाषा

जगातील सर्वात जुनी भाषा तमिळ आहे. देशाचे दुर्दैव म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही कुठलाही भारतीय अभिमानाने आमच्या देशात जगातील सर्वात जुनी भाषा बोलली जाते असे म्हणत नाही. सर्वात जुनी भाषा भारतातील असल्याचे मी जगाला सांगू इच्छितो. काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर तमिळ भाषेला चालना देण्यासाठी काहीच केलेले नाही. परंतु आता आम्ही असे होऊ देणार नाही असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

पलक्कडमध्ये रोड शो

केरळच्या पलक्कडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ रोड शो केला आहे. या रोड शोकरता हजारोंच्या संख्येत लोक उपस्थित राहिले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये कमळ फुलणार आहे. राज्यात सत्तारुढ डावे आणि विरोधात असलेल्या काँग्रेसकडून केवळ भ्रष्टाचार करण्या त आला असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article