चोरीचा तपास करण्याची सूचना करा
12:44 PM Dec 05, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : संगमेश्वरनगर येथे 25 मे 2025 रोजी घडलेल्या चोरी प्रकरणाचा तपास एपीएमसी पोलिसांकडून रेंगाळला आहे. या चोरीमध्ये सुमारे 7 लाख रुपयांचे दागिने पळविले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याची सूचना पोलिसांना करावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी संगमेश्वरनगर येथील मीना चौहान व त्यांचा मुलगा संजयकुमार यांनी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना दिले आहे. संगमेश्वरनगर येथे झालेल्या चोरीत सुमारे 6 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व 70 हजार रुपयांचे चांदीचे दागिने अशा एकूण 7 लाख रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, अद्याप या प्रकरणाचा तपास लागला नाही. त्यामुळे पोलिसांना तपासाची सूचना करावी, अशी मागणी केली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article