होमवर्क करण्याऐवजी खाऊ लागले मुले
अभ्यास आणि परीक्षेचा तणाव मुलांसाठी नवी बाब नाही. परंतु चीनमध्ये मुलांनी यापासून दिलासा मिळावा म्हणून अजब पद्धत शोधली आहे. येथे काही मुले स्वत:चा होमवर्क करण्याऐवजी त्याला खाण्याबद्दल बोलत आहेत. बाजारात असे स्नॅक्स विकले जात आहेत, जे अत्यंत छोटी वही किंवा पुस्तकासारखे दिसतात. या अजब स्नॅकला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ‘होमवर्क’ नावाने विकले जातेय. हा ट्रेंड चीनच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुलांमध्ये चर्चेत आला आहे.
तांदळाने तयार होमवर्क
या एडिबल म्हणजेच खाण्यायोग्य होमवर्कला तांदळाच्या कागदाने तयार केले जाते. हे पाहण्यास छोटेसे पुस्तक किंवा वहीसारखे असते. चीनच्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर अशाप्रकारच्या एडिबल वर्कबुकची किंमत अत्यंत कमी सांगण्यात आली आहे. एका पीसची किंमत 0.50 युआन म्हणजेच 7.5 अमेरिकन सेंटपेक्षाही कमी आहे.
परीक्षेच्या तणावाशी संबंध
या ट्रेंडमागे मुलांचे शिक्षण आणि परीक्षेचा दबाव एक कारण मानले जातेय. मुलांसाठी होमवर्क आणि परीक्षा अनेकदा तणावाचे कारण ठरतात. अशा स्थितीत ‘होमवर्क खाणे’ एक प्रकारची मजेशीर आणि तणाव कमी करण्याची पद्धत ठरली आहे. म्हणजेच मुलांना ज्या गोष्टीची सर्वाधिक समस्या असते, त्या गोष्टीलाच ते खाण्याच्या मजेशीर शैलीत स्वीकारत आहेत, याला मुलांसाठी तणाव कमी करणारी एक हलकीफुलकी पद्धत मानण्यात येत आहे, परंतु हे वास्तविक शिक्षणाच्या दबावावर तोडगा नाही.
लोकांना पसंत पडली कल्पना
या अनोख्या ट्रेंडची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही लोकांसाठी ही कल्पना अत्यंत मजेशीर आहे. मुलांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास ज्या होमवर्कला पाहून मन खट्टू होते, त्यालाच खाण्याच्या गोष्टीत बदलणे एक मजेशीर कल्पान वाटते.
खाण्याच्या सुरक्षेवरून प्रश्न
हा ट्रेंड मजेशीर दिसत असला तरीही याच्यासोबत अन्नसुरक्षेचा प्रश्नही जोडलेला आहे. अशाप्रकारच्या खाद्यपदार्थांवरून सुरक्षेच्या चिंतेचा उल्लेख होतोय. खासकरून मुलांप्रकरणी पॅकेजिंग, प्रॉडक्ट आणि उत्पादकाच्या माहितीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये असे सांगण्यात येते. चीनमध्ये व्हायरल झालेला हा ट्रेंड पाहण्यास मजेशीर असला तरीही यामागे मुलांचे शिक्षण आणि परीक्षांचा दबावही दिसून येतो. होमवर्क खाण्याची कल्पना मुलांसाठी एक चेष्टा असू शकते. परंतु ही बाब याकडे इशारा करते की शिक्षणाचा दबाव मुलांसाठी किती अवजड जाणवू शकतो. सध्या चीनमध्ये एडिबल ‘होमवर्क’चा हा ट्रेंड सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. छोट्या वहीसारखी दिसणारी गोष्ट खातानाची मुलांची छायाचित्रे सध्या चर्चेत आहेत.