जगभरात इंस्टाग्राम झाले डाऊन
64 टक्के वापरकर्त्यांना समस्या : समस्या सोडण्यासाठी कंपनीचे प्रयत्न
नवी दिल्ली :
इंस्टाग्राम जगभरात डाउन झाले होते. सकाळी 11.30 वाजल्यापासून ही समस्या सुरु झाली. अनेक वापरकर्त्यांनी इतर सोशलमीडिया प्लॅटफॉर्मवर आणि सर्व्हिस मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म डाउनडिटेक्टरवर याची नोंद केली आहे. अनेक वापरकर्ते अॅप लॉगिन समस्येचा सामना करत आहेत तर काही वापरकर्त्यांना सर्व्हर कनेक्शनची समस्या निर्माण झाली होती. यावर इंस्टाग्रामकडून वापरकर्त्यांना एक संदेश प्रदर्शित केला आहे. तो म्हणजे ‘सॉरी, काहीतरी चूक झाली’ असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
64 टक्के लॉगिन समस्या तर 24 टक्के सर्व्हर समस्या
ऐह्म्tाद च्या मते, सुरुवातीला 64 टक्के वापरकर्त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम या खात्यांमध्ये लॉगइन करण्यात समस्या नोंदवली, तर 24 टक्के वापरकर्ते सर्व्हर कनेक्शन समस्या अनुभवत होते. तर 11 टक्के वापरकर्त्यांना इंस्टाग्राम अॅपशी जोडण्यात अडचणी जाणवत होत्या.
15 मे आणि 5 मार्चलाहीअॅप होते डाउन
याअगोदर 15 मे रोजी जगभरातील अनेक युजर्ससाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम डाउन झाले होते. त्यानंतर वापरकर्त्यांना फीड रीफ्रेश करण्यात समस्या येत होती. त्याचवेळी, 5 मार्चच्या रात्री इन्स्टाग्राम आणि फेसबुकदेखील डाउन होते. तरीही, वापरकर्त्यांना फीड रीफ्रेश करताना लॉगइन करण्यात व समस्या येत होत्या.
3 वर्षांपूर्वी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप 6 तास होते बंद
4 ऑक्टोबर 2021 रोजी जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्म जवळपास 6 तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कोट्यावधी वापरकर्त्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. ही समस्या रात्री 9.15 च्या सुमारास घडली. या बंदीचा परिणाम अमेरिकेतील फेसबुकच्या शेअर्सवरही दिसून आला.
5 वर्षांपूर्वी साडेनऊ तास व्यत्यय
3 जुलै 2019 रोजी रात्री 8 वाजता भारत, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप
आणि इंस्टाग्राम डाउन होते. सुमारे 9.5 तास खाली राहिल्यानंतर 4 जुलै 2019 रोजी सुरळीत झाले होते.