महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुतारी संघर्षातून प्रेरणा देणारी....शरद पवारांनी केले पक्षचिन्हाचे अनावरण!

05:06 PM Feb 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
Tutari Sharad Pawar
Advertisement

“निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला दिलेली तुतारी संघर्षातून प्रेरणा देणारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री असून या ऐतिसाहिक भूमीतून आपण प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. ते आज रायगडावरून आपल्या नविन पक्षाचे नविन चिन्ह तुतारीच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

Advertisement

अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठींबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली. त्यानंतर अजित पवार यांनी पक्षावर तसेच पक्षचिन्हावर दावा सांगितल्यावर निवडणूक आयोगाने ते अजित पवार गटाला बहाल केले. त्यामुळे शरद पवार गटाने निवडणूक आयोगामध्ये धाव घेऊन पक्षचिन्हाची मागणी केली. त्यानुसार निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिले. तसेच पक्षचिन्ह म्हणून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे वाटप केले.

Advertisement

तुतारी हे ऐतिहासिक चिन्ह असल्याचा दावा शरद पवार गटाने केल्यानंतर त्याच्या अनावरणाचा भव्य कार्यक्रम आज रायगडावर आयोजित करण्यात आला होता. वयोमानानुसार शरद पवार यांना रायगडावर चढता येणार नसल्याने पालखीतून राजगडावर पोहोचले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संस्थापक शरद पवार यांनी आज आपल्या गटासाठी 'तुतारी फुंकणारा माणूस' हे नवीन पक्षाचे चिन्हाचे अनावरण केली. आज रागडावर झालेल्या या सोहळ्यामध्ये शरदचंद्र पवार गटाच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावलेली होती.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, "सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे...या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील”असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी, “निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे....संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे....तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया” असं आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

 

Advertisement
Tags :
sharad pawarthe party symbolTutari sTutari struggle
Next Article