For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इन्स्पेक्टर अविनाश 2 चा ट्रेलर प्रदर्शित

07:00 AM May 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
इन्स्पेक्टर अविनाश 2 चा ट्रेलर प्रदर्शित
Advertisement

रणदीप हूडामुख्य भूमिकेत

Advertisement

रणदीप हूडाची आगामी सीरिज ‘इन्स्पेक्टर  अविनाश’च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नीरज पाठक दिग्दर्शित या सीरिजमध्ये 1990 च्या दशकातील उत्तरप्रदेशची झलकक असून त्यात पोलीस, प्रशासन आणि गुंडगिरीसोबत जबरदस्त रक्तपात आहे. या नव्या सीझनमध्ये इन्स्पेक्टर अविनाश मिश्राच्या जीवनातील जबरदस्त वादळ उभं राहत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. याच्या ट्रेलरमध्ये गुन्हेगारी, राजकारण आणि भ्रष्टाचारासोबत कहाणीचा रोमांचही जबरदस्त आहे.  गुन्हेगारी म्होरक्या शेख आणि त्याची साथीदार रहस्यमयी देवीची एक घातक शस्त्रास्त्र टोळी आहे. तर व्यवस्थेत विश्वासघातामुळे झालेले निलंबन आणि अटक होत इन्स्पेक्टर अविनाश एका मोठ्या कटाचा शिकार होतो.  अविनाशला यावेळी केवळ गुन्ह्यांशी नव्हे तर परिवार, सत्य आणि स्वत:च्या अस्तित्वासाठी लढताना दाखविण्यात आले आहे. उत्तरप्रदेशचे पोलीस अधिकारी  अविनाश मिश्रा यांच्या जीवनावर आधारित ही सीरिज आहे. मिश्रा यांना राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी एसटीएफचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. या सीरिजमध्ये उर्वशी रौतेला, अमित सियाल, अभिमन्यू सिंह, रजनीश दुग्गल, शालिन भनोट आणि फ्रेडी दारूवाला हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.