For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक बँकेच्या समितीकडून प्रयाग चिखली गावाची पाहणी

05:38 PM Feb 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
जागतिक बँकेच्या समितीकडून प्रयाग चिखली गावाची पाहणी
Prayag Chikhli Village World Bank Committee
Advertisement

प्रयाग चिखली वार्ताहर

पूरनियंत्रण उपायोजनांचे प्रस्तावाबाबत जागतिक बँकेच्या समितीने नुकतीच पुराचा मोठा तडाका बसलेल्या प्रयाग चिखली(ता.करवीर) गावाला क्षेत्रीय भेट देऊन पाहणी केली.

Advertisement

यावेळी गावचे उपसरपंच अमर आंबले सदस्य दीपक कुरणे सचिन पाटील आबिद मुल्लानी सुरज कांबळे अमित पोवार तसेच ग्रामसेवक सतिश पानारी यांनी समिती सदस्यांचे स्वागत करून गेल्या काही वर्षातील पूरस्थिती ची माहिती दिली.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पूर नियंत्रणाबाबत उपाययोजना प्रस्तावाची आवश्यकता असल्याबाबत वास्तव स्थिती समिती सदस्यांना दाखवून उपायोजनांची नितांत गरज असल्याचे सांगितले.

Advertisement

यावेळी समिती सदस्य व जिल्हा प्रशासनिक अधिकाऱ्यांनी प्रयाग चिखली येथील पंचगंगा संगम परिसरात भेट देऊन माहिती घेतली. यावेळी प्रयाग चिखली गावाच्या वतीने कोल्हापूर पन्हाळा रत्नागिरी महामार्गाच्या भराव्यामुळे पूरस्थिती गंभीर होत असल्याने हा भरावा हटवावा अशा मागणीचे निवेदन उपसरपंच अमर आंबले यांनी यावेळी दिले

Advertisement
Tags :

.