For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायाधिशांकडून कामांची पाहणी

12:59 PM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यायाधिशांकडून कामांची पाहणी
Advertisement

सीईओ संजित रॉड्रिग्स यांनी दिली माहिती : न्यायाधिशांनी व्यावसायिकांच्या ऐकल्या समस्या

Advertisement

पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा स्थित न्यायाधिशांनी काल सोमवारी सायंकाळी राजधानी पणजीतील स्मार्ट सिटी कामांची रस्त्यावर उतऊन पाहणी केली आणि प्रत्यक्ष कामाचे स्वऊप पाहिले. स्मार्ट सिटी इमॅजिन पणजी लि.चे सीईओ संजित रॉड्रिग्स यांनी कामांची माहिती न्यायाधिशांना दिली आणि ठरलेल्या मुदतीत कामे संपतील, असे स्पष्ट केले. दरम्यान, पणजीतील धूळ प्रदूषणप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर पुढील सुनावणी आज मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी होणार आहे. उच्च न्यायालयाचे न्या. महेश सोनक व न्या. वाल्मिकी मिनेझिस यांनी सांत ईनेज पणजी येथील चौकातून पुढे चालत जाऊन रस्त्याची, धूळ प्रदूषणाची अवस्था पाहिली. त्या कामामुळे, धुळीमुळे कसे त्रास होतात, व्यवसायावर परिणाम होतो याची माहिती लोकांनी न्यायाधिशांना दिली. या कामांची पाहणी करण्याचे न्यायाधिशांनी अगोदर सांगितले होते. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.