For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ले व शिरोडा बसस्थानकाची सांगली स्वच्छता कमिटीकडून तपासणी

05:00 PM Jan 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ले व शिरोडा बसस्थानकाची सांगली स्वच्छता कमिटीकडून तपासणी
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
राज्यपरिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ''स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान '' स्पर्धे अंतर्गत वेंगुर्ले आगार व वेंगुर्ले बस स्थानक तपासणीस आलेले सांगली विभागाच्या पथकाचे वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी वेंगुर्ले बसस्थानकावर स्वागत केले.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून राज्यातील ३१ जिल्हयातील राज्य परिवहन महामंडळाची आगारे व बसस्थानके यांची तपासणी व्हावी. प्रवाश्यांना सेवा व सुविधा मिळतात कि नाही. याबरोबर आगार व बसस्थानकांत गाड्यांसह परिसराची स्वच्छता राहते कि नाही याची दरवर्षी पाहणी व्हावी व त्या दृष्टीने प्रवाश्यांना सोयी सुविधा , कमतरता असलेल्या भागात त्या देण्याच्या उद्देशाने राज्यपरिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येत आहे.

Advertisement

या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत सहभागी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 18 बस स्थानकांची तपासणी या सांगली विभागाच्या समिती मार्फत सुरु आहे. आज मंगळवारी वेंगुर्ले बस स्थानक व शिरोडा बस स्थानक या वेंगुर्ले आगाराच्या बस स्थानकांचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या सांगली विभागाच्या सर्वेक्षण समितीचे प्रमुख सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय अभियंता सुशांत पाटील, सांख्यिकी अधिकारी अनिल पार्टे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील यांचे वेंगुर्ले बस स्थानकावर वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत प्रवासी संघटना प्रतिनिधी राधाकृष्ण वेतुरकर, या समितीचे प्रतिनीधी दैनिक तरुण भारतचे पत्रकार भरत सातोस्कर, प्रवासी प्रतिनिधी प्रा. वैभव खानोलकर, वेंगुर्ले आगारातील कर्मचारी रोहिदास कामत आदी उपस्थित होते.या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत वर्षभरात वेंगुर्ले आगाराच्या अधिपत्याखाली येणाऱ्या वेंगुर्ले बस स्थानक व शिरोडा बस स्थानक या बस स्थानकातील परिसर, बसेस, वेंगुर्ले आगार परीसर, बस स्थानक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण पूरक वसुंधरे बाबत केलेले काम, प्रवाशांसाठी केलेल्या सेवा सुविधा तसेच अन्य बाबी यांची पाहणी या समितीने प्रत्यक्ष विविध जागेवर जात केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.