नाट्यगृहाच्या कामाची प्रशासकांकडून पाहणी
कोल्हापूर :
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाच्या पुनर्बांधणी कामाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी मंगळवारी पाहणी केली. यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पहिल्या टप्प्याचे काम लवकरात लवकर व नियोजित वेळेत संपवणेच्या सूचना संबंधित ठेकेदार व सल्लागार कंपनीला दिल्या.
पहिल्या टप्यातील कामामध्ये सध्या स्टेजवरील पाच ट्रस बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यापैकी आज पहिला ट्रस जागेवर बसविण्याचे काम पुर्ण करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर दगडी बांधकामही सुरु आहे. दुसऱ्या टप्यातील कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या यामध्ये नऊ निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्याची तांत्रिक छाननी सुरु असून छाननी पूर्ण झाल्यांनतर पात्र ठेकेदारांची व्यापारी निविदा उघडण्यात येणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या टप्याच्या निविदेच्या अनुषंगाने निविदा प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, नाट्यागृह व्यवस्थापक समीर महाब्री, ट्रकवेल कंपनीचे सल्लागार आर्किटेक्ट चेतन रायकर, रंगकर्मी आनंद काळे, प्रसाद जमदग्नी उपस्थित होते.