For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. बी. आर. आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक मार्गाची पाहणी

12:41 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
डॉ  बी  आर  आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक मार्गाची पाहणी
Advertisement

महापौर, उपमहापौर, नगरसेवक, दलित नेत्यांची उपस्थिती

Advertisement

बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात 14 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाली व दलित संघटनेच्या नेत्यांनी बुधवारी मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्कलपासून ते राणी कित्तूर चन्नम्मा सर्कलजवळील डॉ. आंबेडकर उद्यानापर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर त्याचबरोबर सत्ताधारी गटनेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष मल्लेश चौगुले, सिदराय मेत्री व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली. पाहणी दौऱ्यावेळी महापौर-उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. मिरवणुकीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत यासह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी दलित नेत्यांनी केली. त्याचबरोबर महानगरपालिकेकडून भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.