कोलगाव व आंबेगावातील भात पिकाची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी
शेतकऱ्यांच्या भात लागवडीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे कौतुक
ओटवणे | प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात कोलगाव व आंबेगाव येथे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भाताच्या महान या वाणाला भरभरून पीक आले असुन या भरघोस पिकाची कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांच्या भात लागवडीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे कौतुक केले.कोलगाव गावातील शेतकरी मोहन बाबना ठाकूर आणि आंबेगावातील शेतकरी सिताराम शंकर परब यांनी कोलगाव येथील अंकुर कृषि सेवा केंद्र यांच्या माध्यमातून मिळालेल्या महान या वाणाची लागवड आपल्या शेतात केली. या पिकाच्या योग्य जोपासणीमुळे या दोन्ही शेतकऱ्यांना या वाणाचा उत्तम रि्सल्ट मिळाला. महाऍग्री कंपनीने संशोधित केलेल्या महान ह्या भाताच्या वाणाचा कालावधी सुमारे १३० ते १३५ दिवस असून अतिशय फाईन असे हे सुधारित वाण आहे. भरघोस उत्पादन देणाऱ्या या वाणाला उंचीही चांगली असून कोकणातील जमिनीला साजेसे असे हे सुधारित वाण आहे. यावेळी सावंतवाडीचे उपकृषि अधिकारी यशवंत गव्हाणे आणि कोलगाव सहाय्यक कृषि अधिकारी अक्षय चव्हाण यांनी विविध योजनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कोलगाव आणि आंबेगाव या दोन्ही गावातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याबद्दल महाऍग्री कंपनीचे अभिषेक चव्हाण तसेच कोलगाव येथील अंकुर कृषी सेवाचे मुकेश ठाकूर यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.