For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीरभद्रनगर परिसरातील समस्यांची आमदार राजू सेठ यांच्याकडून पाहणी

10:24 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
वीरभद्रनगर परिसरातील समस्यांची आमदार राजू सेठ यांच्याकडून पाहणी
Advertisement

बेळगाव : आमदार राजू सेठ यांनी बुधवारी वीरभद्रनगर व फारुकिया कॉलनी या परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये नागरिकांनी रस्ता, पाणी, गटारी यासह इतर समस्या आमदारांसमोर मांडल्या. नवीन प्रकल्प राबविण्यात येणार असून यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली. रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, सैनिकनगर या परिसराला भेटी देण्यात आल्या. सध्या शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असून, यासंदर्भात व्यवस्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पिण्याचे पाणी कुठेही कमी पडू देणार नाही, असे आश्वासन सेठ यांनी दिले. यावेळी नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.