महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभाध्यक्ष-सभापतींकडून सुवर्णसौधमधील तयारीची पाहणी

11:10 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सोमवार दि. 4 डिसेंबरपासून सुवर्ण विधानसौधमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी विधानसभाध्यक्ष यु. टी. खादर व विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सुवर्ण विधानसौधला भेट देऊन तयारीची पाहणी केली. सभाध्यक्ष व सभापतींनी दोन्ही सभागृहे, मीडिया सेंटर, मंत्री-आमदार, पत्रकार, अधिकाऱ्यांसाठीची भोजन व्यवस्था आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. दोन्ही सभागृहात माईक व्यवस्था सुस्थितीत आहेत का? याची चाचणी घेतली. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, विरोधी पक्षनेते व सभाध्यक्षांच्या कार्यालयातील व्यवस्थेची व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खोल्यांची पाहणी करण्यात आली. अधिवेशनाच्या कर्तव्यासाठी बेंगळूरहून आलेल्या मार्शल यांची रहाण्याची व जेवणाच्या व्यवस्थेबाबत चौकशी केली. शाळकरी मुले व नागरिकांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी व्यवस्था करावी, अशी सूचना सभाध्यक्षांनी आपल्या सचिवालयाच्या अधिकाऱ्यांना केली. दोन्ही सभागृह व विविध कार्यालयांची पाहणी केल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी विधानसभेच्या सचिव विशालाक्षी, विधान परिषदेच्या सचिव महालक्ष्मी, जिल्हाधिकारी नितेश पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article