For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव विमानतळ परिसराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

06:22 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव विमानतळ परिसराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
Advertisement

धावपट्टी, अग्निशमन व्यवस्थेचा घेतला आढावा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

सांबरा येथे बेळगाव विमानतळावर सुरक्षेसंदर्भात नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. विमानतळावरील धावपट्टीच्या दर्जासोबत परिसरात होऊ घातलेल्या विकासकामांची पाहणी करण्यात आली. यावेळी बेळगाव विमानतळ अधिकाऱ्यांना सूचना करून अनेक बदल सुचवण्यात आले.

Advertisement

विमानो•ाण करताना व उतरवताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एखादी चूक झाली तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. यासाठीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विमानतळाची वरचेवर पाहणी केली जाते. इलेक्ट्रिकल सिग्नल मिळणे, यासोबतच वैमानिकासोबतचे संपर्क याविषयी माहिती जाणून घेण्यात आली. विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली.

विमानतळावर मॉक ड्रिल

आग लागून कोणतीही दुर्घटना घडल्यास तात्काळ कशा पद्धतीने उपाययोजना राबवाव्यात, यासाठी विमानतळावर मॉक ड्रिल घेण्यात आले. विमानतळ अग्निशमन विभाग, तसेच जवानांनी अधिकाऱ्यांसमोर मॉक ड्रिल सादर केले. एखाद्या वेळेस एअरक्राफ्टला आग लागल्यास धावपट्टीपासून प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

Advertisement
Tags :

.