For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव विमानतळ परिसराची महसूल उपायुक्तांकडून पाहणी

11:40 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव विमानतळ परिसराची महसूल उपायुक्तांकडून पाहणी
Advertisement

विकासकामांच्या धर्तीवर घेतला आढावा

Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या परिसरात अनेक विकासकामे केली जाणार आहेत. यासंदर्भात बेळगावचे महसूल विभागाचे उपायुक्त श्रवण नाईक यांनी नुकतीच बेळगाव विमानतळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. विमानतळाशेजारील रस्ता, परिसरातील वसाहती यासह इतर भागांना भेट देऊन त्यांनी विकासकामांची माहिती जाणून घेतली. बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी खासदार जगदीश शेट्टर यांच्या उपस्थितीत विमानतळाच्या विकासासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विमानतळावर असणाऱ्या त्रुटींबाबत चर्चा झाली होती. विमानतळाच्या शेजारी असणारे रस्ते, विमानतळाच्या प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या रहिवासी वसाहती, त्याचबरोबर इतर भागात विकासकामे राबविली जाणार आहेत. गुरुवारी महसूल विभागाचे उपायुक्त श्रवण नाईक यांनी या सर्व विकासकामांचा आढावा घेतला. विमानतळ संचालक त्यागराजन यांनी त्यांना प्रकल्पांची माहिती दिली. त्यांच्यासोबत विमानतळाचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.