For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएनएस अंजदीप नौदलाच्या ताफ्यात सामील

06:14 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयएनएस अंजदीप नौदलाच्या ताफ्यात सामील
Advertisement

भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ : ‘डॉल्फिन हंटर’च्या रुपात डिझाइन

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

भारतीय नौदलाला आणखी एक पाणबुडीविरोधी युद्धनौका अंजदीप प्राप्त झाली आहे. उथळ पाण्यात काम करण्याची क्षमता असणाऱ्या 8 पाणबुडीविरोधी युद्धनौकांच्या साखळीतील ही तिसरी युद्धनौका शुक्रवारी चेन्नई येथे आयोजित सोहळ्यात नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहे. या सोहळ्यात नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी सामील झाले आहेत. ही युद्धनौका कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सने (जीआरएसई) स्वदेशी  स्वरुपात डिझाइन आणि निर्मित पेले आहे.

Advertisement

ही युद्धनौका ‘डॉल्फिन हंटर’च्या रुपात कार्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आली असून याचा मुख्य उद्देश किनारी क्षेत्रांमध्ये शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध लावणे, त्यांचा पाठलाग करणे आणि त्यांना नष्ट करणे आहे. आयएनएस अंजदीप स्वदेशी, अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्धप्रणालीने युक्त आहे. चेन्नईच्या बंदरावर आयोजित एका अधिकृत सोहळ्यात अॅडमिरल त्रिपाठी यांनी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, सरकारी अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयएनएस अंजदीपला औपचारिक स्वरुपात नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केले आहे.

अंजदीप नाव का?

अंजदीप हे नाव कारवारच्या किनाऱ्यानजीक असलेल्या अंजदीप बेटाच्या नावावर देण्यात आले आहे. ही युद्धनौका 80 टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीने निर्माण करण्यात आली असून यामुळे देशाच्या संरक्षण निर्माण क्षमतेला बळ मिळणार असून आयातीवरील निर्भरता कमी होणार आहे. अंजदीप नौदलाच्या याच नावायच जुन्या युद्धनौकेचा नवा अवतार आहे. जुनी युद्धनौका 2003 साली निवृत्त झाली होती.

पाणबुडीविरोधी युद्धनौका

77 मीटर लांब या युद्धनौकेत एक हायस्पीड वॉटर-जेट प्रोपल्शन सिस्टीम असून ती याला त्वरित प्रतिक्रिया आणि निरंतर संचालनासाठी 25 सागरी मैला कमाल वेग प्राप्त करण्यास सक्षम करते. कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सकडून निर्मित, आयएनएस अंजदीप अत्याधुनिक युद्धनौका असून तिला विशेष स्वरुपात किनारी युद्धवातावरणाच्या आव्हानांच सामना करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. पाणबुडीविरोधी युद्धाच्या भूमिकेसोबत ही युद्धनौका किनारी देखरेख, कमी तीव्रतेच्या सागरी मोहीम आणि शोध तसेच बचाव अभियानांना मूर्त रुप देण्यासाठी सुसज्ज आहे.

आयएनएस अंजदीपची वैशिष्ट्यो..

-आयएनएस अंजदीपला डॉल्फिन हंटरच्या रुपात विकसित करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाचे सांगणे.

-आयएनएस अंजदीप किनारी क्षेत्रांमध्ये शत्रूच्या पाणबुडीचा शोध घेत तिला निष्क्रीय करण्यास सक्षम.

-सुमारे 77 मीटर लांबीची ही युद्धनौका वॉटरजेटने संचालित नौदलाची आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका.

-आयएनएस अंजदीपमध्ये हलके टॉरपीडो, स्वदेशी पाणबुडीविरोधी रॉकेट, उथळ पाण्यात काम करणारी सोनार सिस्टीम.

-अंजदीपमुळे खोल समुद्रातील शत्रूंच्या धोक्यांचा शोध लावणे आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता वाढणार आहे.

-नौदलाची किनारी देखरेख आणि सागरी सुरुंग पेरण्याची क्षमता आयएनएस अंजदीपमुळे मजबूत होणार.

Advertisement
Tags :

.