महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

करवाढीची सीओडीमार्फत चौकशी करा

11:33 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शहरातील मालमत्तांच्या करामध्ये भरमसाट, तसेच मनमानीपणे वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मोठे गोडबंगाल झाले असून त्याची सीओडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. या घरपट्टी वाढीबाबत मोठ्या तक्रारी आल्या आहेत. मोठमोठे मॉल व इमारतींचे कर चारपटीने वाढले आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांचीच चूक असल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. गुरुवारी मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सुरुवातीलाच या विषयावर जोरदार चर्चा झाली. करवाढीमध्ये मोठी तफावत झाली आहे. अनेकांना त्याचा फटका बसला आहे. तेव्हा याचा पुन्हा सर्व्हे व्हावा आणि करवाढीबाबतचा संपूर्ण खुलासा अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणीही महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.

Advertisement

भूभाडे निविदेबाबत सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भूभाड्याची निविदा दुसऱ्या कंत्राटदाराला देण्याबाबत ठराव करण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी केला. मात्र, विरोधी गटातील नगरसेवकांनी त्यावर चर्चा करूनच निर्णय घेतला पाहिजे. तसेच सदर कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली आहे. तो खटला प्रलंबित असल्याने त्यावर सभागृहात चर्चाही करू नका, असे कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांची पंचाईत झाली. भाजपच्या नगरसेवकांनी भूभाडे निविदा दुसऱ्याला देण्याचा ठराव करून संमत करण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी गटाच्या नगरसेवकांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. याचबरोबर पूर्वी असलेल्या भूभाडे कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतल्याने सत्ताधारी गटासमोर अडचण निर्माण झाली आहे.

Advertisement

स्मार्ट सिटीअंतर्गत 135 कोटीचा निधी

बेळगाव शहराची स्मार्ट सिटी पाईंट-2 मध्ये निवड झाली. त्यामुळे शहराच्या विकासासाठी 135 कोटीचा निधी मिळणार आहे. त्या निधीचा वापर योग्यप्रकारे करावा, असे यावेळी सांगण्यात आले. यापूर्वी नियोजनाच्या अभावामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, पुढीलवेळी या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्यात यावी, असे सांगण्यात आले.

खडेबाजार पोलिसांना दिली ताकीद

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फलक हटाव मोहीम राबविली. त्यावेळी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल करून त्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न खडेबाजार पोलिसांनी केला. काही कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसतानाही त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे खडेबाजार पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षकांना बोलावून त्यांना यापुढे असे गुन्हे दाखल करू नका, अशी सक्त ताकीद दिली आहे.

सर्वसाधारण सभेला चक्क कार्यकर्तेही उपस्थित...

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला नगरसेवक, आमदार, खासदार, अधिकारी व पत्रकार वगळता इतरांना बसण्यासाठी परवानगी नाही. मात्र काहीजण आपल्या नेत्यांची नावे सांगून पत्रकारांच्या मागेच ठाण मांडून बसले होते. कौन्सिल विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या नेत्याची नावे सांगत त्या बैठकीमध्ये ठाण मांडले. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article