कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मळगाव येथे इनोव्हा कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

05:52 PM Oct 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली /वार्ताहर
मळगाव येथे सायंकाळी सुमारे ४:४५ वाजताच्या सुमारास इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सुरज परब (रा. तळवडे) जखमी झाले .मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव येथून आपल्या तळवडे येथील घरी जात असलेल्या दुचाकीस्वाराला कारने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि दुचाकीवरील परब जखमी झाले. घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमी दुचाकीस्वाराला मदत केली व त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.दरम्यान,मळगाव परिसरातील हा राज्यमार्ग अत्यंत अरुंद असून वाढत्या वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत आहेत. या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# TARUN BHARAT SINDHUDURG # NEWS UPDATE # KONKAN UPDATE #ACCIDENT
Next Article