Kolhapur Crime | कोल्हापूरमध्ये पिस्तूलसह सराईत गुंड जेरबंद; ५० हजारांचे शस्त्र जप्त
उजळाईवाडी उड्डाण पुलाजवळ सापळा
कोल्हापूर - दहशतीसाठी कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईत गुंडास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले. ऋषिकेश ऊर्फ सोन्या रामू कुडाडे (वय २७, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली) असे त्याचे नाव आहे. पिस्तूल पुरविणारा त्याचा साथीदार विकास देवदास वाघमारे ऊर्फ पांडा शेट याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार सोन्या कुडाडे हा पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यांनी याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिली. सोमवारी सायंकाळी उजळाईवाडी उड्डाण पुलाजवळ तो येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे या ठिकाणी सापळा रचून ऋषीकेशला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडे
सराईत गुंडाचा शोध सुरू ऋषीकेश कुन्डाडे याच्यावर मारामारीसड खुनाचा प्रयत्न करणे यासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने हे पिस्तूल त्याचा मित्र विकास वाघमारे ऊर्फ पांडा शेट याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. पिस्तुल विकणारा विकास वाघमार याच्या विरोधातही लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
काडतुसांचा शोध सुरू
ऋषिकेश कुन्डाहेजवळ केवळ पिस्तूल मिळाले आहे. जिवंत काडतुसांचा शोध पोलीस घेत आहेत. त्याने मित्र वाघमारेकडून घेतलेल्या काडतुसांचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला आहे का? याचीही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ५० हजार रुपये किमतीची गावठी पिस्तूल सापडले.