For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींकडून कर्नाटकवर अन्याय

11:43 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींकडून कर्नाटकवर अन्याय
Advertisement

राहुल गांधी यांचा आरोप : विजापूर येथे काँग्रेसची प्रचारसभा : विकासनिधीच्या वाटपात केंद्राकडून दुटप्पी धोरण

Advertisement

वार्ताहर /विजापूर 

कर्नाटक राज्य देशातील सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. या भागाच्या विकासनिधीच्या वाटपात केंद्रातील भाजप सरकारने दुटप्पी धोरण अवलंबले आहे. त्यामुळे अनेक नागरिक केंद्रातील सुविधांपासून वंचित आहेत. देशात अवैज्ञानिक जीएसटी लागू करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने जीएसटीच्या रूपात 100 रुपये दिले तर केंद्र सरकार 13 रु. परत देत आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकवर अन्याय करत आहेत, हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी केले. येथील सोलापूर रस्त्यावरील एएसपी कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर आयोजित काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेत ते बोलत होते. दरम्यान, एआयसीसीचे राष्ट्रीय प्रधान सचिव रणदीप सुरजेवाला यांचा मंत्री डॉ. एम. बी. पाटील आणि शिवानंद पाटील यांच्या हस्ते राहुल गांधी यांचा सत्कार करण्यात आला. राहुल गांधी पुढे म्हणाले, केंद्रात इंडिया गठबंधन सत्तेवर आल्यास कर्नाटकवर होणारा अन्याय आपण दूर करणार आहे. सध्याची लोकसभा निवडणूक फार महत्त्वाची आहे.

Advertisement

एक पक्ष, एक व्यक्ती राज्यघटना, लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. संविधानाने भारतीय नागरिकांना आवाज, सत्ता आणि आरक्षण मिळाले आहे. एकीकडे नरेंद्र मोदी संविधान नष्ट करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी संविधान बदलण्यासाठी अनेक विधाने केली आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघराज्यातील पक्ष भारतीय संविधानाचे रक्षण करण्यात मग्न आहेत. मोदीजींनी गेल्या 10 वर्षात 25 लोकांना अरबपती बनवले. भारताची संपत्ती, भारताचा सर्व नफा अदानीसारख्या लोकांना दिला.भारताची सौरऊर्जा, पवनऊर्जा, विमानतळ इत्यादी अदानीसारख्या उद्योगपतींना दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. मोदींनी केवळ 25 लोकांना अब्जाधीश केले आहे. मात्र, आम्ही लाखो लोकांना करोडपती बनविण्याचे स्वप्न साकारणार आहोत. गृहलक्ष्मी योजनेमुळे कर्नाटक दिवाळखोर होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले होते. मात्र, तसे काहीच झालेले नाही. कर्नाटकातील 1 कोटी महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ होत आहे. मोदींनी ज्या योजनांच्या घोषणा केल्या त्याचे फलित नागरिकांना मिळालेले नाही.

शेतकऱ्यांची कर्जे माफ करणार

काँग्रेसच्यावतीने नरेगा हमी वेतनप्रमाणे डिप्लोमासारखा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणांना सरकारकडून 1 वर्षाचे प्रशिक्षण देऊन सक्षम केले जाईल. कुशल आणि प्रशिक्षित असलेल्या करोडो तरुणांना तयार केले जाईल. शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यात येणार आहेत. आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट करणार आहोत. नरेगाचे मानधन 400 रुपये करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सभेस एआयसीसी राष्ट्रीय महासचिव रणदीप सुरजेवाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, जिल्हा प्रभारी मंत्री डॉ. एम. बी. पाटील, साखर-कृषी मंत्री शिवानंद पाटील, केपीसीसीचे कार्याध्यक्ष विनय कुलकर्णी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन लोणी, आमदार यशवंतराय गौडा पाटील, सी. एस. नाडगौडा, अशोक मनगोळी, विठ्ठल कटकदोंड, आमदार सुनीलगौडा पाटील, प्रकाश राठोड, नेते अब्दुलहमीद मुश्रीफ, माजी आमदार डॉ. मकबूल बागवान, शरणप्पा सुणगार, कर्नाटक राज्य कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष कांता नाईक, श्रीकांत छायागोळ आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.