कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Aajara Political News: अन्याय निवारण समिती भरणार निवडणुकीत रंग, हालचालींना वेग

02:13 PM Jul 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चुकीचे काम करणाऱ्यांबरोबर आम्ही जाणार नाही, असे जाहीर केलंय

Advertisement

By : सुनिल पाटील

Advertisement

आजरा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. गेली दोन वर्षे जनतेचे प्रश्न घेऊन लढा देत असलेल्या आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने नगरपंचायत निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. अन्याय निवारण समितीच्या या घोषणेमुळे आजरा नगरपंचायत निवडणुकीत मात्र रंग भरणार आहेत. तर प्रमुख आघाड्यांकडून उमेदवारी डावलली गेल्यास नाराज झालेले मातब्बरही गळाला लागण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.

आजऱ्यातील सामान्य माणसांच्या समस्या सोडविणे, सार्वजनिक प्रश्नांच्या निर्गतीसाठी प्रयत्न करणे, यातूनच आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती अस्तित्वात आली. आजरा नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत सर्व 17 जागा तसेच नगराध्यक्षपदाचीही जागा लढविण्याची घोषणा केली आहे. यावेळी चुकीचे काम करणाऱ्यांबरोबर आम्ही जाणार नाही, असे जाहीर केलंय.

गतवेळच्या निवडणुकीत दोन प्रमुख आघाड्यांबरोबरच तिसरी आघाडी अस्तित्वात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यावेळी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व केले होते. त्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीला भले फारसे यश आले नाही. मात्र, या आघाडीने घेतलेल्या मतांचा फायदा कोणाला झाला आणि फटका कोणाला बसला हे आजरेकर जनतेने पाहिले आहे. यावेळीही तसा प्रयोग होण्याचा

अन्याय निवारण समितीच्या झेंड्याखाली?

आपापल्या पक्षाचे कार्य करीत केवळ जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या समितीमध्ये कार्यरत असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पक्षीय पातळीवर निवडणुका लढविण्याचाही निर्णय राज्यातून होण्याची शक्यताही अधिक आहे. तसे झाल्यास समितीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांसाठी संघटित लढा देणारी ही सर्वपक्षीय मंडळी प्रत्यक्ष निवडणुकीत अन्याय निवारण समितीच्या झेंड्याखाली लढणार का? हा प्रश्न आज तरी अनुत्तरीत आहे.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#NagarPanchayat#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaAajara NewsAajara Political NewsMahayutiPolitical Newssthanik swarajya sanstha election 2025
Next Article