Sangli News | तासगावात जखमी उदमांजराला जीवदान; प्राणीमित्राच्या तत्परतेने बचाव
तासगाव : तासगाव-तुरचीरोडवरील नेताजी कांबळे यांच्या शेताजवळ एक उदमांजर जखमी अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. वन्यजीव संकटात असल्याचे लक्षात येताच नेताजी कांबळे यांनी तत्काळ सर्पमित्र व प्राणीमित्र अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच अविनाश जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने जखमी उदमांजराचे रेस्क्यू केले.त्यानंतर त्याच्यावर आवश्यकप्रथमोपचार व उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर झाल्याचे दिसून आल्यावर त्या वन्यप्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
या तत्परतेमुळे एका दुर्मिळ वन्यजीवाचा जीव वाचला असूनया परिसरातील नागरिकांनी अविनाश जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. कोणताही वन्यजीवआढळल्यास त्याला इजा न करता तज्ज्ञांच्या मदतीने त्याला सुरक्षित करण्याचे आवाहनअबिनाश जाधव यांच्यातर्फे यावेळी करण्यात आले.
उदमांजराचे पर्यावरणातील महत्त्व
उवमांजर हा निसर्गातील अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून उंदीर व इतर लहान प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.