For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नायकोलनजीक भाजीचा टेंपो उलटून क्लीनर जखमी

10:16 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
नायकोलनजीक भाजीचा टेंपो उलटून क्लीनर जखमी
Advertisement

वार्ताहर /गुंजी

Advertisement

बेळगावहून गोव्याकडे भाजीपाला घेऊन जाणारा भरधाव टेंपो उलटून झालेल्या अपघातात क्लीनर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे नायकोलनजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली. सदर टेंपो बेळगावहून भाजीपाला घेऊन गोव्याकडे जाताना वाहनावरील ताबा सुटल्याने सदर टेंपो रस्ता सोडून गटारीतून बाहेर गेल्याने पलटी झाला. त्यामुळे या वाहनमध्ये असलेला क्लिनर किरकोळ जखमी झाला असून चालकही बालाबाल बचावला आहे. सदर टेंपो रस्त्यापासून जंगलात जवळजवळ 20 फुटावर जाऊन पलटी झाला. मात्र दैव बलवत्तर म्हणून चालक व क्लीनर दोघेही बचावले. परंतु सदर टेंपोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर टेंपोमध्ये असलेला भाजीपालाही सर्वत्र विखुरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

वेगावर नियंत्रणाची गरज

Advertisement

सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता जवळजवळ पूर्णत्वाकडे असला तरी अद्याप बऱ्याच ठिकाणी पूल आणि मोऱ्यांचे काम अर्धवट आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण असण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर या महामार्गावरून अवजड वाहतुकीला प्रतिबंध केला असला तरी रात्रीच्या वेळी शेकडो अवजड वाहने भरधाव गेल्याने अनेकवेळा अपघात घडत आहेत. दुचाकीधारकांना प्रवास करताना जीवमुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर वेगावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.