चेहऱ्यावर रोज टोचायची ‘सिलकॉन’चे इंजेक्शन
विचित्र झाली अवस्था
सुंदर चेहरा मिळविण्याची इच्छा जेव्हा मानसिक आजाराचे रुप धारण करते, तेव्हा याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचे जिवंत अन् भीतीदायक उदाहरण पोलंडमधून समोर आले आहे. येथील एक 26 वर्षीय युवती एल्वाने महागडे डॉक्टर आणि कॉस्मेटिक क्लीनिक्सच्या फीपासून वाचण्यासाठी इंटरनेटवरून नकली आणि विनापरवाना ब्यूटी प्रॉडक्ट्स खरेदी केले. यानंतर तिने कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय घरीच स्वत:हून चेहऱ्यावर सिलिकॉनचे इंजेक्शन लावून घेण्यास सुरुवात केली. या जीवघेण्याच्या निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून आता तिच्या चेहऱ्याची अवस्था बिकट झाली आहे. एल्वा आता स्वत:ला आरशात ओळखू देखील शकत नसल्याची स्थिती आहे.
मूळ स्व्रुपात पोलंडच्या एका छोट्या शहरात जन्मलेले एल्वा मागील अनेक वर्षांपासून स्वत:ची शारीरिक रचना आणि लुकवरून मानसिक तणावाला सामोरी जात होती. स्वत:च्या चेहऱ्याला बदलण्याच्या इच्छेपोटी तिने काही वर्षांपूर्वी ब्लॅक मार्केटमधून संशयास्पद कॉस्मेटिक उत्पादने ऑर्डर करण्यास सुरुवात केली होती. प्रारंभी तिने स्वत:च चेहऱ्यावरील चरबी घटविणाऱ्या औषधांचे इंजेक्शन आठवड्यात दोनवेळा स्वत:च्या चेहऱ्यावर टोचून घेण्यास सुरुवात केली. याचा प्रभाव म्हणजे तिचा चेहरा गरजेपेक्षा अधिक पातळ झाला. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी तिने इंटरनेटवरूनच इंजेक्टेबल लिपोलिसिस आणि नकली सिलिकॉन खरेदी केले आणि ते चेहऱ्यावर इंजेक्ट करण्यास सुरुवात केली.
प्रारंभी मी आठवड्यात एकदा सिलिकॉन इंजेक्शन टोचून घेत होते, परंतु हळूहळू याची अशी सवय जडली की दरदिनी स्वत:च्या चेहऱ्यावर स्वत:च सुई टोचून घेऊ लागले. त्यावेळी मी वॉर्सा शहरात राहत होते आणि माझी बहुतांश कमाई घरभाड्यासाठी खर्च व्हायची, यामुळे माझ्याकडे तज्ञ डॉक्टराकडे जाण्यासाठी पैसे नव्हते. अशास्थितीत कुठल्याही वैद्यकीय प्रशिक्षणाशिवाय आणि मोठ्या प्रमाणात नकली सिलिकॉनचा वापर केल्यामुळे पूर्ण चेहऱ्यावर गंभीर सूज आली, माझ्या त्वचेवर डाग पडले आणि डोळे सूजमुळे जवळपास पूर्णपणे बंद झाल्याचे एल्वा सांगते.
एल्वाने ज्या उत्पादनांचा वापर केला, ती प्रमाणित नव्हती आणि हे अत्यंत धोकादायक आहे. सध्या कुठलेही गंभीर संक्रमण दिसत नसले तरीही पुढील 6 महिन्यांमध्ये ही सूज जीवघेण्या संक्रमणाचे रुप धारण करू शकते, ज्यात तिच्या डोळ्यांना सर्वात मोठा धोका असल्याचे एस्थेटिक मेडिसीन तज्ञ डॉ. मारेक वासिलुक यांनी सांगितले आहे.
एल्वा ‘बॉडी डिस्मॉर्फिया’ नावाच्या गंभीर मानसिक आजाराने पीडित आहे. यात व्यक्ती स्वत:च्या वास्तविक रुपाला नापसंत करू लागतो आणि जोखिमीची पर्वा न करता काल्पनिक रुप मिळविण्याच्या हट्टात बुडून जातो असे मनोवैज्ञानिक पॉलिना मिएर्जेजेवस्का यांचे सांगणे आहे. डॉक्टरांनुसार एल्वाला परत सामान्य स्थितीत आणण्यासाठी प्रथम मानसिक समुपदेशन आणि मग चेहऱ्याच्या नुकसानाचे आकलन करण्यासाठी एमआरआय करावे लागणार आहे.