लवकरच येणार पिता येणारे इंजेक्शन
पाण्यात विरघळवत पिऊ शकणार लोक
मुलांना जन्मापासूनच अनेक लसी देण्यात येतात, वेदना, सुईची झंझट आणि दरवर्षी फ्ल्यू शॉटची आवश्यकता अनेक लोकांना त्रास देते. परंतु आता वैज्ञानिक एका अशा दिशेने काम करत आहेत, जेथे लसीला पाण्यात विरघळवून कॉफीप्रमाणे पिता येऊ शकणार आहे. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी बेकरच्या यीस्टपासून एक नवा फ्ल्यू व्हॅक्सिन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. प्राध्यापक फेई वेन आणि ग्रॅज्युएट स्टूडंट ट्रँग होआंग यांच्या टीमने याला एसीएस फॉल 2026 मीटिंगमध्ये सादर केल्यापासून हे चर्चेत आले आहे.
काय आहे नवी पद्धत?
पारंपरिक फ्ल्यू व्हॅसिन अंड्यांमध्ये विषाणूंची पैदास करत तयार केल्या जातात. ही पद्धत महाग, अधिक वेळ घेणारी (सुमारे 6 महिने) आणि नव्या स्ट्रेन्ससाठी मंदगतीची आहे. बहुतांश व्हॅक्सिन हेमाग्लगुटिनिन (एचए) प्रोटीनला टार्गेट करतात, जे वेगाने बदलत राहते. नव्या संशोधनात एम2 प्रोटीनवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. हा प्रोटीन 1918 च्या महामारीपासून आतापर्यंत अपेक्षाकृत स्थिर राहिला आहे आणि अनेक स्ट्रेन्समध्ये समान आहे. वैज्ञानिकांनी यीस्टला जेनेटिकली मॉडिफाय करत एम2 युक्त व्हायरस-लाइक पार्टिकल्स (व्हीएलपी) निर्माण केले. हे पार्टिकल्स व्हायरससारखे दिसतात, परंतु संक्रमण फैलावत नाहीत. उंदरांवरील चाचणीत 18 उंदरांना ही लस देण्यात आली. त्यांनी अनेक स्ट्रेन्सच्या विरोधात अँडीबॉडीज निर्माण केल्या आणि तीन वेगळ्या स्ट्रेन्सच्या चॅलेंजमध्ये 100 टक्के सुरक्षा प्राप्त झाली आहे.
ओरल व्हॅक्सिनची शक्यता
टीमने तंत्रज्ञानाचा एका कंपनीला परवाना दिला असून ती यीस्ट-आधारित ओरल व्हॅक्सिन विकसित करत आहे. भविष्यात इंजिनियर यीस्ट स्ट्रेन्सला ‘ब्रू’ करून ओरल व्हॅक्सिन तयार केली जाऊ शकते. हे सायन्स फिक्शनप्रमाणे वाटते, परंतु शक्यता रोमांचक आहे. याचे अनेक फायदे होतील, याचे वेगाने उत्पादन (जवळपास एक महिन्यात) केले जाऊ शकते, तसेच हे अत्यंत स्वस्त असेल आणि हे व्यापक सुरक्षा (अनेक स्ट्रेन्सच्या विरोधात) प्रदान करणार आहे. याचबरोबर दीर्घकालावधीच्या सुरक्षेची अपेक्षा (बूस्टर कमी लागू शकतात) यापासून केली जात असल्याचे प्राध्यापक वेन यांनी सांगितले आहे.
फ्ल्यू दरवर्षी लाखो मृत्यू आणि कोट्यावधी गंभीर प्रकरणांचे कारण ठरतो. जर ही लस यशस्वी ठरली तर वार्षिक इंजेक्शनची आवश्यकता कमी होऊ शकते. ही पद्धत सध्या प्रारंभिक टप्प्यात (माउस स्टडी) आहे, इम्युनिटी किती काळ टिकते, मानवी परीक्षण, सुरक्षा आणि प्रभावोत्पादकतेवर अद्याप काम करावे लागणार आहे. तर पिण्यायोग्य लस उपलब्ध होण्यास अद्याप काही काळ लागणार असल्याचे वेन यांचे सांगणे आहे.