महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छत्रपती शाहूराजे तरुण मंडळाचा पुढाकार

04:42 PM Jan 20, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

लोकसहभागातून ११ किलो चांदी जमवणार, भाविकांना दान करण्याचे आवाहन
आजवर सव्वा ३ किलो जमा
कोल्हापूरः संग्राम काटकर
तीन वर्षापूर्वी राजारामपुरी-शाहूनगरातील नुतनीकरण केलेल्या नवश्या मारूती मंदिरातील मारूतीच्या मूर्तीला चांदीचा मुलामा करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प दुसरे-तिसरे कोणी नसून मंदिर व्यवस्थापन व मंदिराजवळील छत्रपती शाहूराजे तरूण मंडळानेच केला आहे. संकल्पाला सत्यात आणण्यासाठी अकरा किलो चांदी अपेक्षित धरली असून ती लोकसहभागातून जमवली जाणार आहे. मंडळाने चांदी दान करण्याचे आवाहनही केले. अनेकांनी प्रतिसाद देत सव्वातीन किलो चांदी दान दिली आहे. अद्यापही 8 किलो चांदी मिळणे बाकी असून कोल्हापुरातील भाविकांनी चांदी देण्यासाठी पुढे यावे ऐवढीच मंडळाची अपेक्षा आहे. चांदी अथवा रक्कम स्वऊपात दान स्वीकारले जाईल, असेही मंडळाचे सांगणे आहे.
शाहूनगरात १९९६ साली स्थापलेल्या नवश्या मारूती मंदिराच्या उभारण्यामागे शाहूनगरातील लोकांची दानत व श्रद्धा दिसून येत आहे. सध्या ज्या चौकोनी जागी मारूतीचे आकर्षक मंदिर उभे आहे ती जागा (कै.) संतूबाई बाळासाहेब साळुंखे यांची होती. पूर्वीच्या काळी याच जागेतील पिंपळाच्या झाडाखाली मारूतीचे छोटे मंदिर होते. मंदिराचा जिर्णोद्धार करून मोठे मंदिर बांधण्यासाठी छत्रपती शाहूराजे तरूण मंडळाने ठरवले. त्यानुसार ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव गायकवाड यांनी ५० जणांची टिम बनवली. या टिमने साळुंखे यांना भेटून मंदिरासाठी जागा देण्याची विनंती केली. त्यांनीही खुल्या मनाने जागा दिली. त्यानंतर मंडळाने वर्षभर लोकसहभागातून पैसे उभा करून साळुंखे यांच्या जागेत मंदिर उभारले. शिवाजी गायकवाड यांनी दिलेली दक्षिण मूखी मारुतीच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केली. मूर्तीचे नवश्या माऊती असे नामकरणही केले.
जसे दिवस सरकू लागले तसे शाहूनगर परिसर मारुती भक्त झाला. अनेकांची कामाची सुरूवात मारूतीच्या दर्शनाने होऊ लागली. मंडळाकडून साजरी केल्या जाणाऱ्या हनुमान जयंती सोहळ्यात तर शाहूनगरासह नजिकच्या भागातील लोक एकवटू लागले. २०२१ साली मंदिराचे नूतनीकरण करण्याचा विचार पुढे आला. दरम्यानच्या काळातील कोरोनासारख्या महामारीचा धोकाही कमी झाला होता. त्यामुळे लोकसहभागातून पैसे उभा करुन मंदिराचे नुतनीकरण केले. पिवळसर-तांबूस रंगांच्या आकर्षक दगडांनी मंदिर सुशोभित केले. पुढे हनुमान जयंतीचे औचित्य साधून शाहूराजे तरूण मंडळाने महाप्रसाद, सोंगी भजनाला सुरूवात केली. तेव्हापासून प्रत्येक जयंतीला महाप्रसाद व सोंगी भजन आयोजित केले जात आहे.
अलीकडेच नवश्या मारूतीच्या मूर्तीला चांदीच्या मुलाम्याने सजवण्याचा मंदिर व्यवस्थापन व मंडळाने संकल्प सोडला आहे. एप्रिल महिन्यातील हनुमान जयंतीदिनापर्यंत मारूतीला चांदीचा मुलामा करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे चांदी जमवण्यासाठी कार्यकर्ते दानशूरांशी संपर्क साधत आहे. जमणाऱ्या चांदीने तीन फुट ऊंद तीन फुट उंच इतक्या आकारात असलेल्या मारूतीच्या मूर्तीला मुलामा करण्यात येणार आहे. मागणीपेक्षा जास्ती चांदी जमली तर दागिने करून ते मारूतीलाच अर्पण केले जाणार आहे. चांदीची चौकटही केली जाईल. तेव्हा ज्यांना चांदी अथवा रक्कम स्वरूपात दान द्यायचे आहे, त्यांनी मारूती मंदिराशी थेट संपर्क साधावा, असे मंडळाचे आवाहन आहे.
मंडळाचे कार्यकर्ते रोज करतात आरती...
मंदिरातील नवश्या मारूतीची चांगली पूजा-अर्चा, सेवा व्हावी म्हणून शाहूराजे मंडळाने मंदिरात आधीपासूनच पगारी पुजारी नेमला आहे. हे पुजारी रोज नित्य पूजा व आरती करतात. सायंकाळीच्या आरतीची जबाबदारी मंडळाने स्वीकारली. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाकडून केल्या जाणाऱ्या आरतीला अनेक कार्यकर्ते न चुकता हजर राहतात, असे मंडळाकडून येत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article