महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाजारात प्रारंभी नरमाई ; अंतिम क्षणी मजबुती

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 335.39 तर निफ्टी 148.95 अंकांनी वधारले

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चौथ्या सत्रात गुरुवारी बुधवारच्या एक दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर बाजार सावरल्याचे दिसून आले. यामध्ये गुरुवारी भांडवली बाजाराची सुरुवात ही नकारात्मक कल घेत झाली. मात्र अंतिम क्षणी सेन्सेक्स व निफ्टी यांची बाजू भक्कम राहिल्याचे पहावयास मिळाले. बाजारात भारती एअरटेल, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि आयटी यांच्या समभागात तेजीचा कल राहिला होता. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 335.39 अंकांनी वधारुन निर्देशांक 73,097.28 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअ रा बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 148.95 अंकांनी तेजी प्राप्त करत निर्देशांक 22,146.65 वर बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये गुरुवारी निफ्टीमध्ये अदानी एंटरप्राईजेस, अदाणी पोर्ट्स, हिंडाल्को, हिरोमोटो कॉर्प आणि ओएनजीसी यांचेसमभाग हे वधारले. तर एचसीएल टेक, कोल इंडिया आणि भारती एअरटेल यांनी मजबूत कामगिरी केली आहे. अन्य कंपन्यांमध्ये मात्र अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, जेएसडब्लू स्टील आणि स्टेट बँक यांचे समभाग हे सर्वाधिक घसरणीत राहिले आहेत.

व्यापक निर्देशांकांच्या मदतीने बीएसईमध्ये मिडकॅप 2.3 टक्क्यांनी तर स्मॉलकॅप हे 3.1 टक्क्यांनी वाढले आहेत. अन्य समभागाच्या व्यतिरिक्त रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मजबूत राहिले आहेत. यामुळे बीएसईमध्ये सीपीएसई निर्देशांक तीन टक्क्यांनी, आयआरएफसीचे 13 टक्क्यांपेक्षा अधिकने मजबूत राहिले. तर आयआरसीओएन हे 12 टक्क्यांनी तर टेक्सको रेल 16 टक्क्यांची तेजी प्राप्त केली आहे. एक्सचेंजच्या डाटानुसार विदेशी संस्थाकडून करण्यात आलेल्या आकडेवारीत बुधवारी 4,595.06 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री करण्यात आली आहे. आशियातील बाजारात सियोल आणि टोकीओ हे तेजीसह बंद झाले तर शांघाय व हाँगकाँगहे प्रभावीत राहिले आहेत. युरोपीय बजारात जादाची चढउतार राहिली होती. तर बुधवारी अमेरिकन बाजारात मिळताजुळात कल होता. जागतिक ऑईल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.76 टक्क्यांनी वधारुन 84.67 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेल राहिले.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article