प्रारंभी घसरण, अंतिम क्षणी तेजीची झुळूक
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बैठकीचे बाजारात प्रभावाचे वारे
मुंबई :
चालू आठवड्यातील भारतीय भांडवली बाजारात तिसऱ्या सत्रात सकाळच्या सत्रात आलेल्या घसरणीमधून सावरत बाजाराने तेजी प्राप्त करत आपला बुधवारच्या सत्रातील प्रवास थांबविला आहे. यामध्ये अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीमधून येणाऱ्या निर्णयांअगोदरच भारतीय बाजारात दबावाचे चित्र राहिल्याचे दिसून आले.
वरील घटनेचा प्रभाव म्हणून बुधवारच्या सत्रात बाजारात दोन्ही निर्देशांक अंतिम क्षणी तेजीची झुळूक प्राप्त करत बंद झाले. विविध कंपन्यांमध्ये आयटीचे समभाग हे दोन टक्क्यांनी नुकसानीत राहिले. यामुळे गुंतवणूकदारांनी आपली भूमिका सावधपणे हाताळली असल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 33.57 अंकांनी वधारुन निर्देशांक 69,584.60 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 19.65 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 20,926.30 वर बंद झाला.
मुख्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, लार्सन अॅण्ड टुब्रो, सनफार्मा, भारतीय स्टेट बँक, टायटन आणि टाटा स्टील यांचे मुख्य समभाग हे वधारुन बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेस, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्स यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले.
भारतीय शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीनी खरेदी केलेल्या समभागांचा आकडा हा मंगळवारच्या सत्रात 76.86 कोटी रुपयांवर राहिल्याची माहिती आहे. तसेच अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह ही आगामी काळासाठी व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी असल्याचे अंदाज व्यक्त होत असल्याचा परिणामही भारतीय बाजारात दिसून येत आहे. जागतिक बाजारात अमेरिकेतील बाजारात तेजी होती तसेच युरोपातील बाजारातही तेजी होती. आशियाई बाजारात मात्र मिश्र कल होता.