For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इन्फोसिस कर्मचाऱ्यांना देणार बोनस

06:59 AM Feb 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
इन्फोसिस कर्मचाऱ्यांना देणार बोनस
Advertisement

वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था / बेंगळूर

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने अलीकडेच आपल्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी 85 टक्के परफार्मन्स बोनस देण्याची घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभाव लक्षात घेता आयटी क्षेत्रामध्ये अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसने ही दिलासादायी घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सदरचा निर्णय सहाय्यकारक ठरेल, अशी आशा कंपनीला वाटते आहे.

Advertisement

कंपनीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा बोनस फेब्रुवारीपासूनच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्यक्तीगत स्तरावर बोनसचे वाटप 75 ते 100 टक्के इतके असणार आहे. काही कर्मचाऱ्यांना मागच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये 15 टक्के अधिक रक्कम प्राप्त झाली आहे. मागच्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीने सरासरी 75 टक्के बोनसचे वाटप केले आहे.

सर्वाधिक बोनसचा दावा

सध्याच्या तिमाहीमध्ये घोषणा केलेला बोनस हा आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक मानला जात आहे. मागणीतील स्थिरता आणि मोठी कंत्राटे मिळाल्याने कंपनीची स्थिती मजबूत आहे. या सकारात्मक वातावरणाचा विचार करुनच कंपनीने वरीलप्रमाणे बोनसची घोषणा केली आहे. सध्याला पाहता कंपनीमध्ये 3.23 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आयटी क्षेत्रामध्ये केला जात असतानाच गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पहायला मिळतेय.

Advertisement
Tags :

.