इन्फोसिसचा नफा 12 टक्क्यांनी कमी झाला
जानेवारी ते मार्च तिमाहीमधील आकडेवारी : महसूल 8 टक्क्यांच्या वाढीसह 40,925 कोटींवर
वृत्तसंस्था/ मुंबई
टेक क्षेत्रातील दिग्गज कंपीन इन्फोसिसने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 6,806 कोटींचा नफा नोंदवला. महसूल 7.6 टक्क्यांनी वाढून तो 41,764 कोटी झाला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी सेवा कंपनी असलेल्या इन्फोसिसने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 7,033 कोटी रुपयांचा नफा (एकत्रित निव्वळ नफा) नोंदवला आहे. तो वार्षिक आधारावर 11.75 टक्क्यांनी कमी आहे. कंपनीने गेल्या वर्षी याच तिमाहीत 7,969 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.
जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने 40,925 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. वार्षिक आधारावर त्यात 7.92 टक्के वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी म्हणजेच आर्थिक वर्ष 23-24 च्या चौथ्या तिमाहीत, टेक कंपनीने 37,923 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. महसूल म्हणजे वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून मिळालेले पैसे आहेत.
इन्फोसिसचा समभाग 6 महिन्यांत 28 टक्क्यांनी घसरला
तिमाही निकालांपूर्वी गुरुवारी (17 एप्रिल) इन्फोसिसचे समभाग हे 1.03 टक्के वाढून 1,427.70 वर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीचा समभाग 11.29 टक्के घसरला. तर 6 महिन्यांत 27.46 टक्के आणि या वर्षी 1 जानेवारीपासून 24.16 टक्के घसरला आहे. कंपनीचे बाजारमूल्य 5.88 लाख कोटी रुपये आहे. 16 जानेवारी ते 17 एप्रिल दरम्यान कंपनीचे बाजारमूल्य सुमारे 2.16 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
इन्फोसिस प्रति समभाग 22 रुपये लाभांश
निकालांसोबत, इन्फोसिसने प्रति समभाग 22 रुपये लाभांश देखील जाहीर केला आहे. कंपन्या त्यांच्या नफ्यातील एक भाग त्यांच्या भागधारकांना देतात, याला लाभांश म्हणतात.