For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्समध्ये इन्फोसिसला 2 कोटींचा दंड

06:31 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्समध्ये इन्फोसिसला 2 कोटींचा दंड
Advertisement

फ्रान्स कामगार प्राधिकरणाकडून 1.75 लाख युरो दंड आकारणी : कामाच्या तासांची स्वाक्षरी केलेली नोंद न ठेवल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फ्रान्सच्या कामगार प्राधिकरणाने इन्फोसिसला 1.75 लाख युरो म्हणजेच सुमारे 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची नोंद ठेवण्याची पद्धत कायदेशीर आवश्यकतांनुसार नसल्याचे आढळून आले. हा दंड फ्रान्सच्या प्रादेशिक कामगार प्राधिकरण ‘ड्रिईट्स इल-द-फ्रान्स’ने लावला आहे. इन्फोसिसने शेअर बाजारात दाखल केलेल्या माहितीमध्ये ही बाब उघड केली आहे.

Advertisement

फ्रान्समध्ये 35 तासांच्या कामाच्या आठवड्याचा नियम लागू आहे. फ्रेंच कामगार कायद्यानुसार, मालकांनी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची अचूक आणि स्वाक्षरी केलेली नोंद ठेवणे आवश्यक आहे.

35 तासांचा नियम : कायदेशीररित्या, आठवड्यात 35 तास काम करण्याचा नियम लागू आहे.

ओव्हरटाईम आणि विश्रांती: ओव्हरटाईम आणि विश्रांतीच्या कालावधीची नोंद ठेवणे आवश्यक आहे.

ऑडिट डेटा: हा डेटा असा असावा की प्राधिकरण तो सहजपणे तपासू शकेल.

एका वापरकर्त्याने म्हटले- ‘भारतात कॉर्पोरेट गुलामगिरी ही एक सामान्य गोष्ट आहे’

या बातमीच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर वर्क-लाइफ बॅलन्स (काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल) यावर एक चर्चा सुरू झाली आहे.

एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, ‘फ्रान्समध्ये पूर्णवेळ काम 35 तासांचे असते आणि करार 48 तासांपर्यंत जाऊ शकतात. कार्यालयीन वेळेत, शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांमध्ये कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे बेकायदेशीर आहे.’

दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘आता फ्रेंच कर्मचारी सामान्य काम करतील आणि कामाचा भार भारतावर येईल, कारण येथे कॉर्पोरेट गुलामगिरी ही एक सामान्य गोष्ट बनली आहे आणि हे चुकीचे आहे.’ आणखी एका वापरकर्त्याने म्हटले, ‘तरुणांना परदेशी कार्यसंस्कृती आवडत आहे. भारतात वर्क-लाइफ बॅलन्सकडे दुर्लक्ष केले जाते आणि सरकारने 6 दिवसांच्या कामाच्या आठवड्यात 40 तासांपेक्षा जास्त काम करण्यावर कठोर कायदेही केलेले नाहीत.’

Advertisement
Tags :

.