For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीट पेपरफुटी प्रकरणातील ‘सूत्रधार’ रॉकी गजाआड

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
नीट पेपरफुटी प्रकरणातील ‘सूत्रधार’ रॉकी गजाआड
Advertisement

बिहारमधील नालंदा येथे सीबीआयकडून अटक : प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे उलगडता येणार

Advertisement

वृत्तसंस्था /पाटणा

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने राकेश रंजन उर्फ रॉकीला नालंदा (बिहार) येथून अटक केली आहे. यानंतर रॉकीला पाटणा येथील सीबीआय न्यायालयात हजर केल्यानंतर त्याना 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने पाटणा आणि कोलकात्यासह चार ठिकाणी छापे टाकले. राकेशचा (रॉकी) शोध घेण्यासाठी आयपी अॅडेस आणि ईमेल अॅडेसद्वारे शोध घेण्यासाठी सीबीआयने प्रगत तंत्रांचा वापर केला.

Advertisement

रॉकी मूळचा नवाडा येथील असून त्याचे खरे नाव राकेश आहे. तो काही काळापासून रांचीमध्ये राहत असून एक रेस्टॉरंट चालवतो. नीटचा पेपर लीक झाल्यानंतर सुरुवातीला तो रॉकीने सोडवला आणि नंतर तो चिंटूच्या मोबाईलवर पाठवल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे. नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआय या व्यक्तीचा सर्वाधिक शोध घेत होती. अटकेनंतर रॉकीला सीबीआयने मुख्य न्यायदंडाधिकारी (सीबीआय) हर्षवर्धन यांच्या न्यायालयात हजर केले. रॉकीला हजर केल्यानंतर तपास यंत्रणेने रॉकीला कोठडीत ठेवण्याची विनंती केली. सीबीआयने अर्ज दाखल करून दहा दिवसांची कोठडी मागितली होती. सीबीआयची ही मागणी न्यायालयाने मान्य केली. यानंतर तपास यंत्रणा आता आरोपी रॉकीची दहा दिवसांच्या रिमांडवर चौकशी करणार असून नीट पेपर लीक प्रकरणातील सर्व गुपिते उघड करणार आहे.

यापूर्वी धनबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपी बंटीला पाटण्यात आणून चौकशी केली असता त्याने सीबीआयसमोर अनेक महत्त्वाचे खुलासे केले. बंटीच्या चौकशीत रॉकीचे नाव पुढे आले होते. सीबीआयचे पथक इतर आरोपींनाही रिमांडवर घेऊन चौकशी करत आहे. मोबाईल, लॅपटॉप, पासबुक याशिवाय सीबीआयने बंटीच्या घरातून जमीन आणि गुंतवणुकीशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त केली होती. तपासादरम्यान सीबीआयला व्यवहार सेट करण्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळाली.

Advertisement
Tags :

.