पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावी नेतेः हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ कागल मतदार संघातून सलग सहावेळी विजयी
कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेले नेते हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहावेळा विजयी झाले आहेत. अल्पसंख्याक समाजाचे नेते म्हणून त्यांची पश्चिम महाराष्ट्रात ख्याती आहे. विकासकामांच्या जोरावर त्यांनी जिह्यात नावलौकीक मिळवला आहे. मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा, विधी व न्याय, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण, कामगार, ग्रामविकास अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत. यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना न्याय दिला आहे. तसेच मुश्रीफ यांनी आरोग्य क्षेत्रातही विशेष योगदान दिले आहे कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे
आता सलग सहाव्यांदा मुश्रीफ निवडून आले असले तरी यापूर्वी 25 वर्षे ते आमदार म्हणून कार्यरत आहेत. यातील 19 वर्षे त्यांनी मंत्रिमंडळात काम केले आहे .मागील दोन वर्षात कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री राहिले आहेत .
कागलचे पहिले लोकनियुक्त उपनगराध्यक्ष मियालाल (बापूजी) मुश्रीफ यांचे चिरंजीव म्हणजे हसन मुश्रीफ. कागलच्या हिंदुराव विद्या मंदिरातून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मुश्रीफ यांनी 1974 मध्ये शिवाजी विद्यापीठातून बी. ए. ची पदवी घेतली वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी घराची संपूर्ण जबाबदारी मुश्रीफ यांच्यावर आली. त्यानंतर 1985 च्या दरम्यान ते राजकारणात सक्रीय झाले.
1999 पासून सलग सहा वेळा निवडून येणारे हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीत मोदींचा प्रभाव असूनही हसन मुश्रीफ यांनी कागलची एकमेव जागा राखली होती. सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यानंतर कागलच्या जागेसाठी अवघ्या एका वर्षासाठी पोटनिवडणूक झाली. यावेळी मुश्रीफ यांना विधानसभेसाठी पहिली संधी मिळाली. मात्र पहिल्याच निवडणुकीत मुश्रीफ यांचा पराभव झाला. मात्र एका वर्षात त्यांनी राजकारणात चांगला जम बसवला. त्यानंतर ते प्रथम साडेतीन हजार इतक्या मताधिक्याने विधानसभेत निवडून गेले.
कोल्हापूरमध्ये कार्यकर्ता ते काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशी मुश्रीफ यांच्या राजकारणाची सुरूवात झाली. पुढे 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून आजवर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायम आहेत .कार्यकर्ता ते पंचायत समिती सभापती, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री असा 67 वर्षीय मुश्रीफ यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्याबरोबर राहणे पसंद केले त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे .
20-11-1996 ते दि. 25-11-1999 अखेर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तसेच; सन 1985 ते 2009 अखेर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
पहिल्यांदा ऑक्टोंबर 1999 मध्ये विधानसभेवर निवड मा. मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख मंत्रीमंडळात पधुसंवर्धन, दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
जुलै 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, औकाफ खात्याचे राज्यमंत्री.
ऑक्टोंबर 2004 मध्ये विधानसभेवर फेरनिवड. विलासराव देशमुख मंत्री मंडळात 9 नोव्हेंबर 2004 पासून दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, औकाफ व विधी व न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
दि. 10 डिसेंबर 2008 पासून नगरविकास, जमीन कमाल धारणा, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्यांक विकास (औकाफसह) विधी व न्याय
दि. 22 ऑक्टोंबर 2009 मध्ये विधानसभेवर तिस-यांदा विक्रमी 46,412 मतांनी निवड झाली. अशोकराव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण मंत्रीमंडळात नगरविकास, कमाल जमीन धारणा, पशुसंवर्धन, दुग्ध्यविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्याक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्याचे राज्यमंत्री तसेच; कामगार व जलसंपदा या खात्याचे कॅबिनेटमंत्री.
दि.21 मे 2015 पासून आजअखेर कोल्हापूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
दि. 21 ऑक्टोंबर 2019 मध्ये विधानसभेवर सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवड.
दि. 30 डिसेंबर 2019 रोजी मंत्रिमंडळात ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी.
2 जुलै 2023 रोजी वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य या खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी कार्य सांभाळला आहे .
दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मतमोजणीत 11, 879 मतांनी विजयी होऊन सलग सहाव्यांदा आमदारपदी निवड.