For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनआरआयमधील ठेवींचा ओघ घसरला

06:25 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
एनआरआयमधील ठेवींचा ओघ घसरला
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

आर्थिक वर्ष 2027 च्या एप्रिल-जून कालावधीत, एनआरआय ठेवींचा ओघ 141 दशलक्ष डॉलर नोंदवला गेला, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील 1.99 अब्ज डॉलरच्या तुलनेत कमी आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या एप्रिल-जून तिमाहीत, विदेशी भारतीय ठेवींचा ओघ आर्थिक वर्ष 2026 च्या याच कालावधीतील 3.61 अब्ज डॉलरच्या तुलनेत 23.24 टक्क्यांनी घसरून 2.78 अब्ज डॉलरवर आला. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे.

जून 2026 अखेर भारतीय अनिवासींच्या एकूण थकित ठेवी 168.51 अब्ज डॉलर्स होत्या. ही थकित रक्कम मे 2026 मध्ये 165.96 अब्ज डॉलर्स आणि जून 2025 मध्ये 168.33 अब्ज डॉलर्स होती. रिझर्व्ह बँकेने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, ‘मागील महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये अनिवासी भारतीयांच्या एकूण आवक ठेवींमध्ये सुधारणा झाली. धोरणात्मक उपाययोजनांअंतर्गत परकीय चलन अनिवासी-बँक ठेवींमधील वाढ ही प्रामुख्याने भारतीय अनिवासींच्या एकूण आवकमधील वाढीमुळे झाली. यामुळे भारतातील परकीय चलन साठा समाधानकारक स्थितीत पोहोचला.’

Advertisement

प्रवासी जमा योजनांमध्ये परकीय चलन अनिवासी (बँक), अनिवासी बाह्य आणि अनिवासी सामान्य यांचा समावेश होतो. आर्थिक वर्ष 2027 च्या एप्रिल-जून कालावधीत, ठेवींमधील आवक मागील वर्षीच्या याच कालावधीतील 1.77 अब्ज डॉलरच्या तुलनेत 1.73 अब्ज डॉलर होती. जूनमध्ये खात्यांमधील शिल्लक 35.49 अब्ज डॉलर होती, तर जून 2025 मध्ये हा आकडा 35.85 अब्ज होती.

एफसीएनआर खाते ग्राहकांना भारतात सहज रूपांतरणीय परकीय चलनांमध्ये एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी मुदत बचतीची सुविधा देते. वास्तविक पाहता, हे खाते परकीय चलनात ठेवले जाते, त्यामुळे ते ठेव कालावधीत चलनातील चढ-उतारांपासून निधीचे संरक्षण करते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 5 जून 2026 रोजी जाहीर केलेल्या धोरणात्मक उपाययोजनांनंतर, परदेशस्थ भारतीयांच्या ठेवी आणि बाह्य व्यावसायिक कर्ज रकमेत वाढ झाली. परिणामी, 8 जून ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत एफसीएनआरमध्ये 65.4 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा प्रचंड ओघ दिसून आला. याच कालावधीत, ओव्हरसीज फॉरेन करन्सी बॉरोइंगमध्ये 4.9 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि इसीबीमध्ये 2.6 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा ओघ नोंदवला गेला.

Advertisement
Tags :

.