For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

India Economy | सामान्यांना महागाईचा चटका! मार्च महिन्यात घाऊक महागाई दराने गाठली ३.८८ टक्क्यांची पातळी

03:51 PM Apr 16, 2026 IST | NEETA POTDAR
india economy   सामान्यांना महागाईचा चटका  मार्च महिन्यात घाऊक महागाई दराने गाठली ३ ८८ टक्क्यांची पातळी
Advertisement

                     फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये महागाईने ओलांडली मर्यादा

Advertisement

नवी दिल्ली -मार्च महिन्यात घाऊक महागाई दरात लक्षणीय वाढ पहावयास मिळाली आहे. या महिन्यात घाऊक महागाईवाढीचा दर ३.८८ टक्के इतका आहे. फेब्रुवारीत तो केवळ २.१३ टक्के होता. त्या तुलनेत मार्चमध्ये महागाई अधिक वाढली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली कच्च्या इंधन तेलाच्या दरातील वाढ, विमानाचे इंधन आणि व्यापारी उपयोगाच्या इंधन वायूच्या दरात झालेली मोठी वाढ इत्यादी कारणांमुळे मार्च महिन्यात महागाई दरात अधिक वाढ झाली, असे स्पष्ट केले गेले.

मार्चमध्ये जवळपास सर्वच क्षेत्रांना महागाईचा फटका बसल्याचे दिसत आहे. इंधन तेल आणि वायू प्रमाणेच प्राथमिक वस्तू उत्पादित वस्तू नैसर्गिक वायू, उत्पादित पायाभूत धातू, अन्न आणि बिगर अन्न वस्तू तयार अन्नपदार्थ अशा सर्वच वस्तूंचे दर वाढले असल्याची माहिती केंद्रीय सांख्यिकी विभागाने दिली आहे.आंतरराष्ट्रीय स्थिती कारणीभूत संपूर्ण मार्च महिन्यात मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध झाले. ते अद्यापही मिटलेले नसल्यामुळे इंधन तेल आणि गॅस यांच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला. तो आजही येत आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेल यांचे दर अजूनपर्यंत तरी वाढलेले नाहीत. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. युद्ध लवकर बांबले नाही आणि परिस्थिती वेगाने पूर्ववत झाली नाही, तर आणखी महागाई वाढण्याची शक्यता आहे. महागाई दरात वाढ झाली असली, तरी जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झालेली नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.