For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाब काँग्रेसमधील कलह चिघळला

06:31 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंजाब काँग्रेसमधील कलह चिघळला
Advertisement

केवळ पक्षश्रेष्ठींनाच भेटणार चन्नी : बघेल यांच्या बैठकीपासून राखले अंतर

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

पंजाब काँग्रेसमधील कलह जारी असून माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि त्यांचे समर्थक हे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांना पदावरून हटवियणच्या मागणीवर ठाम आहेत. हा वाद सोडविण्यासाठी पक्षाचे पंजाब प्रभारी भूपेश बघेल यांनी बैठकांचे सत्र सुरु केले, परंतु चन्नी यांनी केवळ पक्षश्रेष्ठींनाच भेटणार असल्याची भूमिका घेतली आहे. याचमुळे बघेल यांच्याकडून आयोजित बैठकीत चन्नी, त्यांचे समर्थक आमदार, माजी मंत्री आणि माजी आमदार देखील सामील झाले नाहीत.

Advertisement

चन्नी हे दिल्लीमधून परतले असले तरीही बघेल यांची भेट घेणे टाळले आहे. तर मंगळवारी संध्याकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीमेने चन्नी यांच्याशी संपर्क साधला होता. चन्नी यांची राहुल गांधींसोबत लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. तर प्रियांका वड्रा यांच्याकडून पाठविण्यात आलेली टीम चन्नी यांना यापूर्वीच भेटली आहे. या भेटीनंतर चन्नी आणि त्यांचे समर्थक सध्या शांत आहेत, परंतु पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडी पाहता पक्षश्रेष्ठींना पक्षात फूट पडण्याची भीती सतावू लागली आहे.

मोरिंडा येथे झालेल्या बैठकीत सर्व नेत्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनी चन्नी यांना याप्रकरणी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी अधिकृत पेल होते. याचमुळे प्रदेश प्रभारींपूर्वी चन्नी यांनी राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमक्ष पंजाबमधील नाराज नेत्यांचे म्हणणे मांडावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. राज्यातील बहुतांश नेते वडिंग यांचे नेतृत्व स्वीकारत नसल्याचे चन्नी समर्थक एका आमदाराने सांगितले आहे.

बघेल यांची बैठक

बघेल यांच्याकडून आयोजित बैठकीत काँग्रेस विधिमंडळ गटाचे नेते प्रताप सिंह बाजवा, निवडणूक घोषणापत्र समितीचे अध्यक्ष डॉ. अमर सिंह, निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीचे अध्यक्ष विजय इंदर सिंगला, विधानसभेचे माजी अध्यक्ष राणा केपी सिंह, प्रचार समितीचे सहअध्यक्ष सुखपाल सिंह खैहरा, घोषणापत्र समितीचे सहअध्यक्ष हरदयाल कंबोज समवेत अन्य नेते सामील झाले. सर्व नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकजूटता आहे, नाराज असलेल्या नेत्यांची लवकरच समजूत काढली जाणार असल्याचे बघेल यांनी म्हटले आहे.

बदल न होण्याचा संकेत

बघेल यांनी बैठकीत वर्तमान नेतृत्वात बदल न होण्याचे संकेत दिले आहेत. ज्यानंतर चन्नी समर्थक आणखी नाराज झाले आहेत. काही वरिष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींची दिशाभूल करत अशा नियुक्त्या करविल्या आहेत, ज्या स्वीकारार्ह नाहीत असा आरोप चन्नी गटाने केला आहे.

Advertisement
Tags :

.