महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काकती येथे संसर्गजन्य रोगाबाबत जागृती

06:05 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काकती/वार्ताहर

Advertisement

सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे काकती, सोनट्टी गावात ग्राम पंचायतीच्यावतीने डास निर्मूलन व स्वच्छतेबाबत विशेष मोहिमेसह आरोग्य जनजागृती राबविली जात आहे.

Advertisement

डासांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ग्राम पंचायत अध्यक्ष वर्षा मुचंडीकर, ग्राम विकास अधिकारी अरुण नाथबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिचारिका व सेवकवर्गाला सूचना दिल्या आहेत. प्रत्येक नागरिक महिलांच्या आरोग्याची तपासणी करून औषधे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी साफसफाई, स्वच्छतेबाबत युद्धपातळीवर मोहीम राबविली जात असून घरोघरी प्राथमिक उपाय योजना संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. येथील मराठी, उर्दु, कन्नड शाळा डास निर्मूलनाविषयी उपाययोजना करण्यात येत असून ग्राम पंचायत, पिडीओ, ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांकडून जातीने उपस्थित राहून औषध फवारणी फवारणी केली जात आहे.

मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया व इतर संसर्गजन्य रोगांचा फैलाव करणाऱ्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे. नागरिक, महिलांनी आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, ग्राम पंचायत सदस्य देखील जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. येत्या आठवड्यात याची जागृती तीव्र राबविण्यात येणार असून ग्राम पंचायत अग्रेसर असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article