अपरिहार्य!
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी एका युगाची प्रतीक आहे. त्यांच्या आक्रमक फलंदाजीने, दबावाखालील संयमाने आणि विजयी धावण्याच्या क्षमतेच्या जोरावर भारताने अनेक मोठे यश मिळवले. मात्र, नुकत्याच ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेने या जोडीसमोर नवी आव्हाने उभी राहिली. पहिल्या दोन सामन्यांत अपयश, आणि तिसऱ्या सामन्यातील शानदार पुनरागमनाने मालिका 2-1 ने राखली. या मालिकेत भारताचे अस्तित्व टिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, 2027 च्या विश्वचषकापर्यंत ही जोडी संघात टिकेल का? त्यांच्यासमोरची आव्हाने, निवडकर्त्यांची भूमिका आणि निवृत्त खेळाडूंची मते यावरून हे स्पष्ट होते की, ही जोडी अद्याप अपरिहार्य आहे. पण त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागेल. मालिकेची सुरुवात भारतासाठी धक्कादायक होती. पहिल्या एकदिवशीय सामन्यात पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर पावसामुळे सामना 26 षटकांचा मर्यादित झाला. भारताने मजबूत धावसंख्या उभी केली नाही आणि ऑस्ट्रेलियाने डीएलएस पद्धतीने 131 धावांचे लक्ष्य सहज गाठले. रोहित शर्मा (8 धावा, 14 चेंडू) आणि विराट कोहली (0 धावा, 8 चेंडू) हे दोघेही मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूडच्या वेगवान गोलंदाजीसमोर अपयशी ठरले. रोहितने हेझलवूडच्या बाऊन्सरला एज देत विकेट गमावली, तर विराट स्टार्कच्या बाहेरच्या चेंडूवर झेलबाद झाला. ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफी नंतरची त्यांची आठ महिन्यांनंतरची पुनरागमनाची होती. त्यामुळे पहिल्या सामन्यातील अपयशाने प्रश्नचिन्ह उभे राहिले. भारत 0-1 ने मागे पडला, आणि नव्या कर्णधार शुभमन गिलवर दबाव वाढला. दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात अॅडलेड ओव्हलवर भारताने 264/9 धावा केल्या. रोहितने संघर्षपूर्ण 73 धावांची (97 चेंडू) खेळी केली, श्रेयस अय्यरसोबत 118 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. मात्र, विराट पुन्हा शुन्यावर (दुसऱ्या सामन्यातील पहिली वनडे करिअरमधील सलग शून्य) आऊट झाला. रोहितने हेझलवूडच्या 17 डॉट
बॉल्सचा सामना केला. पण ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू शॉर्ट (74) आणि कोपर काँनॉली (61नाबाद) च्या अर्धशतकांच्या जोरावर 2 विकेट्सने विजय मिळवत मालिका 2-0 ने खिशात घातली. भारताचे अस्तित्व धोक्यात आले. विराट-रोहितची जोडी, जी पूर्वी मालिका वाचवायची, आता स्वत: बचावात्मक स्थितीत होती. त्यांच्यासमोरची प्रमुख आव्हाने स्पष्ट झाली.
ऑस्ट्रेलियातील वेगवान व उसळणारी खेळपट्टी, जिथे त्यांची सरासरी अनुक्रमे 49 आणि 51 असली तरी तिसऱ्या आणि अंतिम एकदिवशीय सामन्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर विराट-रोहितने जुनी जादू पुन्हा दाखवली. ऑस्ट्रेलियाने 236 धावा केल्या, पण भारताने रोहितच्या 100व्या आंतरराष्ट्रीय शतकाने (33वे एकदिवशीय शतक) आणि विराटच्या 84 धावांच्या (58 चेंडू) साथीने 176/1 (28 षटकांत) धावांपर्यंत मजबूत मजल मारली. रोहितने 73 धावांची (85 चेंडू) खेळी करत 60 वे एकदिवशीय अर्धशतक साजरे केले, तर विराटने सुरुवातीची काही षटके वाचवून तीन चौकार ठोकले. त्यांच्या भागीदारीने भारताला 66 धावांनी विजय मिळवून दिला. या सामन्यातील त्यांची खेळी केवळ धावसंख्या नव्हे, तर संघाला दिलेला आत्मविश्वास होता. भारताचे अस्तित्व राखण्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. पहिल्या दोन सामन्यात अपयश असूनही, अंतिम सामन्यातील पुनरागमनाने ते संघाचे कणा ठरले. रोहितने सिडनीवर प्रेम व्यक्त करत ‘माझा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा’ असा संकेत दिला, ज्यामुळे निवृत्तीच्या चर्चा तापल्या. आता प्रश्न आहे, 2027 विश्वचषकापर्यंत ही जोडी संघात टिकेल का? विराट (38 वर्षे) आणि रोहित (40 वर्षे) यांच्यासमोर त्यांचे ज्येष्ठत्व आव्हान आहे. इतर आव्हाने प्रचंड आहेत. प्रथम, फिटनेस: आंतरराष्ट्रीय टेस्ट आणि टी-20 तून निवृत्त झाल्याने त्यांना केवळ एकदिवशीय आणि आयपीएलवर अवलंबून राहावे लागेल. गावस्कर यांनी स्पष्ट म्हटले आहे की, ‘2027 विश्वचषकात ते खेळणार नाहीत, कारण सलग एकदिवशीय कमी होत आहेत, आणि फिटनेस टिकवणे कठीण आहे.’ उमेदीच्या खेळाडूंचा दबाव दुसरा मोठा अडथळा शुभमन गिल, अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल सारखे डायनॅमिक फलंदाज तयार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषकाच्या वेगवान खेळपट्टीवर वयाची अडचण येईल. तिसरे, द्विपक्षीय मालिकांमधील अपुऱ्या सामन्यांमुळे (2025-27 दरम्यान फक्त 27 वनडे) त्यांना विजय हजारे ट्रॉफी सारख्या घरगुती स्पर्धांमध्ये खेळावे लागेल. रोहितसाठी वजन नियंत्रण आणि सातत्य, तर विराटसाठी दबावाखालील फिनिशिंग ही प्रमुख आव्हाने आहेत. निवडकर्त्यांची भूमिका संतुलित आहे. बीसीसीआय मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणतो, ‘परफॉर्म केल्यानंतरच विश्वचषकात जागा मिळेल.’ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, म्हणतो, ‘परफॉर्मिंग असतील तर वयाच्या 45 पर्यंत खेळू शकतात’ पण प्रत्यक्षात दोघेही युवा कोअरला प्राधान्य देत आहेत. शुभमन गिलला कर्णधारपद देऊन संक्रमण सुरू झाले आहे. निवड समिती 2027 साठी युवा-ज्येष्ठ संतुलनावर भर देईल किंवा या दोघांना हटवण्याचा आपला हट्ट पूर्ण करतील. तसे व्हायचे नसेल तर विराट-रोहितला सिद्ध रहावे लागेल. निवृत्त क्रिकेटपटूंची मते संमिश्र आहेत. सुनिल गावस्कर यांनी वय आणि सामन्यांची कमतरता असल्याने शंका व्यक्त केली. रवी शास्त्राr आणि इरफान पठाण यांनी पाठिंबा दिला. ही मते सांगतात की, विराटची फिटनेस आणि रोहितची आक्रमकता अजून विश्वचषकासाठी उपयुक्त ठरेल. संघाला तसेच शुभमनसारख्या उमेदीला ही साथ त्याची वाटचाल सुलभ करेल. पण, वेगवान पिचवर बाउन्सर आणि स्विंगचा सराव ठेवावा लागेल. रोहितने ओपनिंगमध्ये आक्रमक सुरुवात तर विराटने मधल्या षटकांत टिकण्याची भूमिका ठेवावी लागेल. आयपीएल आणि घरगुती क्रिकेटला प्राधान्य देऊन फिटनेस टिकवावे लागेल. विश्वचषकासाठी त्यांचा अनुभव संघाला विजयी करेल, पण त्यांनी स्वत:ला सिद्ध केले तरच टिकतील. विराट-रोहित ही जोडी भारतीय क्रिकेटची अमूल्य संपत्ती आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेने दाखवले की, अपयशातून बाहेर पडण्याची क्षमता त्यांच्यात आहे. 2027 पर्यंत टिकण्यासाठी आव्हानांचा सामना करणे आवश्यक, पण त्यांचा वाटा विश्वचषक जिंकण्यात निर्णायक असेल. भारतीय क्रिकेटप्रेमींना ही जोडी पुन्हा विश्वचषक ट्रॉफी उंचावताना पाहायला आवडेल आणि ते शक्य आहे, जर ते इच्छाशक्तीने खेळले तर!