For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर, सांगलीतील औद्योगिक ग्राहकांसाठी स्वागत कक्ष सुरू; औद्योगिक ग्राहकांनी या कक्षाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

08:25 PM Feb 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोल्हापूर  सांगलीतील औद्योगिक ग्राहकांसाठी स्वागत कक्ष सुरू  औद्योगिक ग्राहकांनी या कक्षाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
mseb
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

औद्योगिक ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देणेकरीता महावितरणमार्फत कोल्हापूर व सांगली जिह्यात ‘स्वागत कक्ष‘ सुरू करण्यात आले आहेत. या कक्षाचे नोडल अधिकारी कार्यकारी अभियंता तर व्यवस्थापक (वित्त व लेखा) व उपकार्यकारी अभियंता हे सदस्य आहेत.
नवीन वीज जोडणी किंवा वाढीव वीजभारसंबंधी स्वागत सेलकडे मागणी नोंदविल्यानंतर संबंधित औद्योगिक ग्राहकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, शुल्क आदींची माहिती दिल्या जाईल. दोन कार्यालयीन दिवसांत कागदपत्रांची पुर्तता, ऑनलाइन अर्ज व प्रक्रिया शुल्क भरण्याची कार्यवाही महावितरणकडून ग्राहकांच्या दारी जाऊन केली जाईल. त्यानंतर लगेचच स्थळ पाहणीच्या तांत्रिक अहवालानुसार फर्म कोटेशन देण्यासह नवीन वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरु होईल. यासोबतच वीजसेवा किंवा बिलिंगच्या प्राप्त तक्रारींचे सेवेच्या कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत किंवा त्यापूर्वीच निराकरण करण्यात येणार आहे. औद्योगिक ग्राहक महावितरण सेवांचा लाभ घेण्यासाठी स्वागत कक्षाशी संपर्क साधू शकतात.

Advertisement

नोडल अधिकारी यांचे संपर्क क्रमांक : कोल्हापूरसाठी 7875769004 तर सांगलीसाठी 7875769012 हा क्रमांक आहे. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांनी या स्वागत कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.