For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंदूधर सीताराम यांचा जिल्हा स्केटीग संघटनेतर्फे सन्मान

10:21 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
इंदूधर सीताराम यांचा जिल्हा स्केटीग संघटनेतर्फे सन्मान
Advertisement

बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे नूतन सहसचिव इंदूधर सीताराम यांचा बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग अकादमीतर्फे गौरव करण्यात आला. इंदूधर सीताराम हे कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग संघटनेचे प्रमुख असून त्यांनी कर्नाटकामध्ये स्केटिंग वाढविण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे. मुळचे बेंगळूरचे रहिवाशी असून त्यांची फेडरेशनच्या सहसचिवपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग अकादमीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूर्यकांत हिंडलगेकर, प्रकाश गावडा, मल्लिकार्जुन काडप्पण्णावर, अक्षय सुर्यवंशी, शशिधर पाटील, मंजुनाथ कुरी, विरुपाक्षीसह कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील स्केटींगचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.