कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रशांत कोरटकर चा पासपोर्ट जप्त करा, इंद्रजीत सावंत यांची मागणी

01:33 PM Mar 22, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

कोल्हापूर

Advertisement

प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याची माहिती प्रसारमाध्यमातून मिळत आहे.अशा प्रवृत्तीच्या माणसाला सुरुवातीलाच अटक व्हायला हवी होती. या प्रकरणाला असा एक महिना पूर्ण होत आला आहे. कायद्याचं संरक्षण नसताना आणि गुन्हे दाखल असताना देखील, असा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी जाऊन पळून जातो, तर हे गृह खात्याचा अपयश आहे. शिवप्रेमी गृहमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ मासाहेब यांचा जो अपमान करेल तो सुटता कामा नये, असे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मागणी केली.

Advertisement

नागपूर पोलिसांच्या सहकार्याबद्दल बोलताना ते म्हणाले, शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला मदत करणारी प्रवृत्ती ला शोधून त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवं. कारवाई करणं गृहमंत्र्यांचे काम आहे त्यांनी याकडे लक्ष देतील असं मला वाटतं.
वरिष्ठ पोलीस अधिकारी संपर्क याबद्दल बोलताना सावंत म्हणाले, माझा आणि प्रशांत कोरटकर चा आयुष्यात कधी संबंध आला नव्हता. मग त्याला माझा मोबाईल नंबर कोणी दिला हे देखील शोधण्याचा भाग आहे. त्याचा मोबाईल तपासला गेला नाही एक महिना झाला आता माझी आशा कमी होत चालली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्गदर्शन याबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अॅड. आसीम सरोदे यांच्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काही पुरावे असतील तर ते वेळ आल्यावर समोर आणतील. प्रशांत कोरटकर चा पासपोर्ट घ्यावा यासाठी पोलिसांना आम्ही अर्ज दिला आहे.

मुख्यमंत्र्यांचा नागपूर दौऱ्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी हा विषय चिल्लर आहे असं न समजता गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा त्याने अपमान केला आहे. यामुळे सर्व शिवभक्तांची मन व्यतीत झालाय अनेक आंदोलन झाली आहेत याचे मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यायला हवी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये तातडीने लक्ष घालून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कारवाई करावी. कोणतीतरी यंत्रणा आहे ही या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे अशी शंका आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article