इंडो काऊट इंडस्ट्रीतील कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पोलिस प्रशासनाने आंदोलन चिरडण्याचा केला प्रयत्नः हातकणंगले येथील तहसीलदार कार्यालयाच्या दारात बेमुदत आंदोलन सुरु
कोल्हापूरः विनोद शिंगे (कुंभोज)
हातकणंगले पोलिस प्रशासनाने दबावतंत्राचा वापर करुन इंडो काऊट इंडस्ट्रीतील कर्मचाऱ्यांचे चाललेले शांततेतील आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे, परिणामी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चाललेले शांततेचे आंदोलन मोडीत काढण्याचाही प्रयत्न झाला. आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी अर्धे नग्न होऊन सदर घटनेचा निषेध केला आणि आपले आंदोलन तहसीलदार कार्यालयाच्या दारात सुरू केली. सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी वारंवार चर्चा करूनही अद्याप कर्मचाऱ्यांचा कुठलाही निर्णय झाला नाही, त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करणे भाग पडले, असे मत उपस्थितांनी मांडले.
तहसीलदार कार्यालयाच्या दारात लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल, तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करुन कर्मचारी अथवा अन्य कोणावरही अन्याय न करता लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. ते त्याला प्रशासनाने सहकार्य करावे. तसेच इंडो काऊट इंडस्ट्रीतील काही अधिकारी चर्चेला तयार झाले, असून लवकरच योग्य तोडगा निघाला. तर सतत आंदोलन चांगल्या पद्धतीने स्थगित करू, अशी मागणी आज पत्रकार बैठकीत हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण जनगोंडा यांनी केली.